✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.4डिसेंबर):-जिल्ह्यातील कुऱ्हा पानाचे ता भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे त्याच्या तयारीसाठी चोपडा येथे कार्यकर्ता बैठक घेण्यात आली त्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार( सटाणा) यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,…सत्यशोधक परंपरा या वैदिक वा पुरोहित वीणा असतात उदा.कुलदेवता पूजन,नवस फेड,..आता सत्यशोधक विवाह पद्धतीचा अंगीकार करावा.. जळगाव जिल्हा हा सत्यशोधक चळवळीच्या कणा राहिला स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी व सिताराम नाना चौधरी हे सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ होते.
चोपडा तालुक्यातील लासुर चहार्डी, आडगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील हरेश्वर पिंपळगाव, पिंपरखेड, या बऱ्याच गावांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली होती. याच्या उल्लेख दिन बंधू या वृत्तपत्रात असून त्यांनी काही पुरावे दाखल डॉक्युमेंट देखील दाखवून त्यांनी सांगितले की सत्यशोधक चळवळ उभी करणे आज गरजेचे आहे सांगून आवाहन केले की, येत्या ११ डिसेंबर रोजी कुऱ्हे पानाचे येथे जळगाव जिल्हात सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन घेण्यात आले आहे या संदर्भात अधिवेशनातील विविध वक्ते उद्घाटक तसेच चर्चा यातून मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी चोपडे तालुक्यातून या अधिवेशनासाठी प्रतिनिधी यावेत असे आवाहन त्यांनी आपल्या भाषनात केले.
या बैठकीला कामगार नेते काम्रेड अमृत महाजन यांनीही मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, मार्क्स, फुले, डॉ.आंबेडकर वादाची चळवळ सत्यशोधक चळवळीच्या भाग असून श्री दिनकर जवळकर, प्रबोधनकार ठाकरे, काँ. शरद पाटील, केशवराव जेधे, शंकरराव देव आदी मंडळी सप्तशोधक विचारांचीच होती. महात्मा ज्योतिबा फुले यांचा संघर्ष हा सावकार शाही व विरुद्ध होता सत्यशोधक विचार हाच सध्याच्या जातीयवादी धर्मानध विचारांचा सुळसुळाट ला वेसन घालेल अशा पार्श्वभूमीवर सत्यशोधकांचे दुसरे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी आपल्या समरोपपर भाषणात केले.
या बैठकीत श्री संत सावतावमाळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक भाषण केले. भाषण झाल्यानंतर श्री खैरनार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या चर्चेत सहभाग देऊन समाधान व्यक्त केले. सदर बैठक कॉ अमृत महाजन यांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती . मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री दिगंबर महाजन हे होते तर डॉक्टर आशिष जाधव, समाधान माळी सर, रमेश राजकुळे, शिवदास माळी,विजय लुल्हे सर, अल्केश महाजन, अतुल भिल, लेनिन महाजन ,सत्यशोधक विधी करते भगवान रोकडे आदी मिटींगला उपस्थित होते