✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.4डिसेंबर):-जिल्ह्यात परतीच्या पावसानं हाहाकार घातला होता, याच परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यातील 143 प्रकल्प भरून ओसंडून वाहत होते. हे प्रकल्प भरल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पाल्लवीत झाल्या आणि त्यांनी झालेल्या नुकसानीला पाठ देत शेतकऱ्यांनी दुभार पीक घेण्याचं ठरवलं आणि आता शेतामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, ही पीक जोमाने डोलताना दिसत आहेत. मात्र या पिकांना आता पाणी देण्याची नितांत गरज आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे काम विद्युत महामंडळांना जोरात केलं. याच्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करत दिल कसंतरी थोडंफार बील भरले.
मुख्यमंत्री साहेब मला तुमच्याशी बोलायचंय
शेतकऱ्याच्या व्यथा:- मात्र शेतकऱ्याला थंडीच्या दिवसात लाईट दिवसा देण्याऐवजी रात्री लाईट दिल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या बीडच्या शेतकऱ्यांना चक्क मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आहे की, मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या शेतात या थंडीच्या दिवसात एक रात्रभर दारे धरून दाखवावेत मग शेतकऱ्याच्या काय व्यथा आहेत. त्या तुम्हाला समजतील अशीच मागणी या शेतकऱ्यांना केली आहे.
शेतकऱ्यांचा विचार का केला जात नाही: मुख्यमंत्री साहेब मला एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला बोलायचं आहे. आम्हाला आमच्या पिकाची अवस्था बघून आज आम्हाला राहवत नाही. रात्री असो दिवसा असो आम्हाला पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही आम्हाला रात्रीची लाईट देताय, त्याचा विचार करा. रात्रीच्याला दारे कशाप्रकारे धरता येतील. सरकारी अधिकाऱ्याला सकाळी 11.00 वाजेपर्यंत थंडी वाजत आहे. मग आमचा शेतकऱ्यांचा विचार का केला जात नाही. आमची व्यथा तुम्हाला मांडत आहोत. मात्र आम्हाला दिवसा लाईट द्या ती फक्त आठच तास द्यावी, रात्रीच्या ला कधी साप चावल कधी विंचू चावल हे सांगता येत नाही.
शेतकऱ्यांचा बळी सरकारला घ्यायचा: लाईट ला करंट लागून सुद्धा अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतायत. आत्ताच चार- पाच दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याचा साप चावून मृत्यू झाला, अशा किती शेतकऱ्यांचा बळी सरकारला घ्यायचा आहे. आणि रात्रीच्याला कसे दारे धरायचे आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी एक रात्रभर त्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षात दारे धरून, दाखवावेत असं माझं मत आहे. साहेब रात्रीच्याला आम्ही दारी धरत आहोत आमच्या अंगावर दैवार पडत आहे. थंडी मरणाची आहे. परंतु पर्याय नाही, शेताला पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी रात्रीच्याला त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये एक रात्रभर दारे धरून दाखवावेत मग शेतकऱ्यांच्या व्यथा काय असत्यात हे त्यांच्या लक्षात येईल, कुठेतरी विचार करतील की रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज देऊ.
फक्त 8 तास लाईट द्यावी: मुख्यमंत्री साहेबांना मला कळकळीची विनंती करून सांगायचं आहे की, आम्हाला जी लाईट तुम्ही देत आहात ती दिवसा लाईट द्यावी. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही 12 तास लाईट देऊ असं सांगतात, पण आम्हाला बारा तास लाईट न देता तुम्ही दिवसा फक्त आठच तास लाईट द्यावी. आम्हाला ऊन, वारा, थंडी याच्याशी संघर्ष करावा लागतो. शेतकऱ्याला संघर्ष करूनच त्याचे जीवन जगावं लागतं. कधी कधी असं वाटतं की ही शेती नको, कारण रात्रीच्याला दारे धरताना दैवार पडतं थंडी वाजते.
दिवसा लाईट द्यावी, अशी मागणी:- या थंडीला कंटाळून शेती हा विषयच नको, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी एक विनंती आहे. आम्हाला लाईट ही 8 तास द्या पण दिवसा द्या. लाईट दिली तर आम्हाला त्याचा फायदा होईल. मात्र, आमची उपजीविका ही शेतीवरच अवलंबून आहे. जर आम्ही रात्रीच्याला दारी नाही धरले तर आम्हाला, आमची उपासमार होईल. कुटूंबावर उपासमारीची वेळ येईल, यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी दिवसा लाईट द्यावी, अशी मी त्यांना मागणी करत आहे.
हा मोठा प्रश्न:- सुशिक्षित बेरोजगार आहे. माझे शिक्षण बीसीएपर्यंत झाले आहे. शेतामध्ये काम करत असताना रात्रीच्याला अनेक अडचणीचा सामना आम्हाला करावा लागत आहे. रानडुकराचा त्रास सहन करावा लागतो. लोकांचा आमच्यावर हल्ला होतो, त्याचबरोबर पिकांची पण ते नासाडी करतात. रस्त्याच्या अडचणी असल्यामुळे आम्हाला दोन- तीन किलोमीटर पायी रात्रीच्याला चालत जावं लागतं. आम्ही दिवसभर काम करून थकलेलो असताना संध्याकाळी, कसे दारे धरणार हा मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही उभा राहु शकत नाही. रात्रीच्याला दारे धरू शकत नाहीत. आमच्या या जागरणामुळे तब्येती बिघडत आहेत.
आमच्यावर उपासमारीची वेळ :- त्यामुळे आम्हाला दिवसाची लाईट असणे अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. आम्ही दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी रात्री चला 12 वाजता लाईट येते. दिवसभर काम करून थकलेलो असतो. आणि झोपायच्या वेळेस लाईट येते आणि दारे धरायचे कसे हा मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस आम्ही झोपतो त्यावेळेस लाईट येते. आणि ज्या वेळेस आम्ही उठतो त्यावेळेस लाईट जाते. आमचे पीक पाण्याला आलेले आहेत. लाईटचा रात्रीचा बाराचा हा टाईम खूप बेकार असल्यामुळे, अशा कारणाने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की, आम्हाला दिवसा लाईट द्या, आमचे पिकं कसेतरी जोपासून आमचा उदरनिर्वाह भागेल, अशी माझी विनंती आहे.