✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)
नागभीड(दि.3डिसेंबर):- तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी,पान्होडी या गावातील दीड महिन्यात चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन वाघा पैकी एका वाघाला आज दिनांक 3 /12 /2022 ला अखेर जेरबंद करण्यात यश आले.वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून त्या वाघाला बेशुद्ध करून पकडले.
तालुक्यात सतत वाघाचे हल्ले सुरू आहेत.शनिवारी वाघाने शेतावर गेलेल्या पाहर्णी येथील एका महिलेचा बळी घेतला होता. या परिसरात या दीड महिन्यातील वाघाच्या हल्ल्याचे चार घटना घडल्या. वनिता वासुदेव कुंभरे (पाहर्णी )ही महिला शनिवारी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्या हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर ढोरपा जवळ असलेल्या टेकरी या शेतशिवारात तोरगांव येथील वाघाच्या हल्यात महिला ठार झाली होती.
तर याच आठवड्यात ढोरपा येथील सविता भुरले या महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे इरव्हा (टेकरी) , मौशी,ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या परिसरात वाघाची चांगली दहशत पसरली होती.आज वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून त्या नरभक्षक वाघाला बे शुद्ध करून जेरबंद केले. सविस्तर वृत्त मिळेपर्यंत पुन्हा तेथे वाघ असल्यामुळे त्या वाघांचा वन विभाग शोध करीत होते