🔸उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन सादर
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.2डिसेंबर):-बोरगडी येथे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतचे सरपंच रवी ढगे यांच्या काकू शकुंतलाबाई साहेबराव ढगे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.
त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम गावालगत ग्रामपंचायत ने नियोजित स्मशानभूमी येथे भूमी अभिलेख कार्यालयाने मोजून दिलेल्या जागेवर अंत्यविधी करत असताना तिथे विकृत जातिय् मानसिकतेच्या आशा कदम यांनी काही गैर कायद्याचे साथीदार येऊन बौद्ध वृद्ध महिलेचा अंत्यविधी थांबून प्रेताची विटंबना करण्यात आली तसेच आशा कदम या चक्क सरणावर जाऊन बसल्या व त्यांनी अंत्यविधी थांबवला ही जागा माझी आहे मी इथे तुमच्या खालच्या लोकांचा अंत्यविधी होऊ देणार नाही असे अर्वाचे भाषेत गलिच्छ बोलली येथील पाहुण्यांनी विनंती केली असता तिने शिवीगाळ केली तेवढ्यावरच त्या न थांबता तिने पोलीस स्टेशन पुसद येथे येऊन जाऊन मयत नातेवाईकासकत् इतर लोकांवर खोटे गुन्ह्याचे रिपोर्ट दिले त्यामुळे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी कोणती ही शहानिशा न करता फिर्यादीवरच खोटे गुन्हे दाखल केले.
त्यामुळे ठाणेदार यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे व अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच बौद्ध महिलेच्या कुटुंबाला शासनातर्फे पोलीस संरक्षण देण्यात यावे असे न झाल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशन नागपुर येथे भीम आर्मी व सहकारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी करिता नम्र निवेदन सादर.
निवेदन देताना सहभागी संघटना वंचित बहुजन आघाडी,प्रज्ञापर्व समिती,भीम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ युनिट,भीमशक्ती सामाजिक संघटना पुसद,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती पुसद यवतमाळ,सुरज कुरील नेता मोची समाज पुसद.इत्यादी संघटनांचे पदाधिकारी, बुद्धरत्न भालेराव, अशोक भालेराव, विठ्ठल खडसे सर, राजेश ढोले, संतोष आंबोरे कैलास श्रावणे, जयानंद उबाळे, सुरज कुरील, यादव हाटे प्रकाश मडके, रोशन पठाण, विश्वपाल कांबळे, गजानन पारटकर, विजू भोणे, बाबाराव पाईकराव, प्रकाश भरकाडे,श्याम देवकुळे ,अरुण राऊत, गोपाल जगताप, संजय कोठुळे, अमोल धुळे, उत्तम कांबळे, परसराम भरकाडे, बबलू पाचपोह्र्र ,गोवर्धन डोंगरे, दिलीप तायडे, गोटे, इत्यादी कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.