Home महाराष्ट्र तांबेपुरा अमळनेर भागात प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

तांबेपुरा अमळनेर भागात प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

96

🔹संभाजी राजेंचा इतिहास सुर्यासारखा तेजस्वी — रामेश्वर भदाणे

🔸बहुजन महापुरुषांचा इतिहास घराघरात पोहचवणार — लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.2डिसेंबर):-अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानातंर्गत छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रीय महापुरुष ह्या विषयावर सानेनगर, तांबेपुरा, न्यु प्लॉट या भागात व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त जवान प्रल्हाद भावसार होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.विजयकुमार तुंटे सर, माजी उपजिल्हाधिकारी एच.टी. माळी साहेब, माजी प्राचार्य शिवाजीनाना पाटील, प्रा. अशोक पवार सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध विषयात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. ऋषिकेश विलास पाटील, मयूर विकास पाटील, इंद्रजित पाटील यांचा कुस्तीपटू म्हणून सत्कार करण्यात आला.

कृष्णा प्रकाश सोनवणे यांची एअर फोर्स मध्ये, शुभम पाटील यांची BSF, जयवंत पाटील यांची पोलीस खात्यात मध्ये निवड झाल्यामुळे तसेच देवेंद्र पाटिल यांची SBI बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक झाल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. अशोक पवार सरांनी त्यांच्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रमाची ब्लु प्रिंट श्रोत्यांच्या समोर ठेवली. सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी बहुजन महापुरुषांच्या कामगिरी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. बहुजन महापुरुषांचा इतिहास घराघरात पोहचवणार असल्याचे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

शिवख्याख्याते रामेश्वर भदाणे यांनी संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संभाजी राजेंचा खरा इतिहास सूर्यासारखा तेजस्वी असल्याचे प्रतिपादन भदाणे सरांनी केले. याप्रसंगी प्रा. विजय तुंटे सर यांचा रशिया दौरा यशस्वी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ.लीलाधर पाटील सर, रणजित शिंदे सर, प्रा.डॉ. विलास पाटील सर, गौतम मोरे सर, अरुण मोरे सर, नरेंद्र अहिरराव सर, विश्वासआबा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील सरांनी केले. वक्त्यांचा परिचय गिरीश पाटिल सरांनी केला तर आभार प्रदर्शन गोपाल महाजन यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी सानेनगर, तांबेपुरा, न्यु प्लॉट परिसरातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here