Home महाराष्ट्र आ.डॉ.गुट्टेंच्या पुढाकारातून जनाईनगरीत आजपासून रंगणार लाल मातीतला थरार

आ.डॉ.गुट्टेंच्या पुढाकारातून जनाईनगरीत आजपासून रंगणार लाल मातीतला थरार

195

🔹येत्या ३ ते ६ डिंसेबर दरम्यान कबड्डी स्पर्धा : मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचा क्रिडा उपक्रम

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2डिसेंबर):- जिल्ह्यातल्या शहरी व ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देणे तसेच राज्यभरातील गुणवंत खेळाडूंच्या खेळाचा अनुभव जिल्ह्यातील क्रिडाप्रेमींना घेता यावा, अशा दुहेरी हेतूने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने येत्या ३ ते ६ डिसेंबर दरम्यान शहरातील क्रोदी रोड येथील खुल्या मैदानावर ४९ व्या कुमार- कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या मैदानास स्व.माणिकराव गुट्टे क्रिडानगरी असे नाव देण्यात आले आहे.
जिल्ह्यातीत युवक-युवतींना कबड्डीचे विशेष आकर्षण आहे.

गावखेड्यातील अनेक जत्रा-यात्रांमध्ये कबड्डी स्पर्धेची परंपरा असून त्यासाठी अनेक खेळाडू व क्रिडाप्रेमी उत्साही असतात. त्यामुळे नियोजित राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमुळे जनाईनगरीत लाल मातीतला कबड्डीचा रंगले थरार गंगाखेडसह जिल्ह्यातील हजारो क्रिडाप्रेमी अनुभवतील.चार दिवसीय कबड्डी स्पर्धेत राज्यभरातील कुमार-कुमारींचे एकूण ५० संघ सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५ ते १० या वेळेत सामने खेळविले जातील. त्यासाठी तब्बल ७०० खेळाडूं व २०० पंच आणि अधिकारी यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे.

स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले नामंकित स्पर्धेक सहभागी होत असल्याने चढाई आणि आक्रमणाचा धडाकेबाजपणा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच सांघिक शिस्त व चपळतेचे सुध्दा प्रदर्शन दिसेल. त्यामुळे डोळ्याचे पारणे फेडणारा हा मैदानी खेळ पाहाण्यासाठी जिल्ह्यातील क्रिडाप्रेमी उत्सुक आहेत.
यापूर्वीही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या आर्थिक सहकार्यातून राज्यस्तरीय कबड्डी आमदार चषक हि स्पर्धा यशस्वी झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद पाहून यंदा तब्बल १५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी उपलब्ध केली आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या भव्य आयोजनामुळे जनाईनगरीची क्रिडानगरी अशी ओळख निर्माण होत आहे, अशी माहिती मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी दिली.

स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे, सचिव मिलिंद क्षिरसागर, उपाध्यक्ष शिवाजी पवार, सदस्य राजेभाऊ सातपतुे, हनुमंत लटपटे, ​कवी विठ्ठल सातपुते, सचिन महाजन, संभुदेव मुंढे, रासप जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, शिवाजी पाटील, अजिमखान पठाण, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेश कदम, सुदाम वाघमारे, मारूती मोहिते, सुभाष देसाई कैलास काळे, गंगाखेड शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राजू खान, इकबाल चाउस, इंतेसार सिद्दीकी, खालेद शेख, सुमित कामत, सतिश घोबाळे, सचिन नाव्हेकर, ब्रिजेश गोरे, महेश शेटे, सचिन जाधव, बाबा पोले, प्रभाकर सातपुते, शाम ठाकूर, गोपी नेजे, महादेव लटपटे, तुकाराम मुंढे, विठ्ठल लटपटे, राजेंद्र चव्हाण, धनराज मुंढे, चैतन्य पाळवदे, भगवान राठोड, जयदीप फड, अंकुश राठोड, पांडूरंग आंधळे, राजकुमार राठोड, विनोद कुलकर्णी, सुभाष साळुंके, भरत मुंढे, शेख रोशन यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदधिकारी विशेष ​परिश्रम घेत आहेत.

*स्पर्धेचे नियोजन व आयोजन उत्तम – मंगल पांडे*
नियोजित स्पर्धेसाठी उत्तम नियोजन व आयोजन केले आहे. राज्यभरातील नामंकित खेळाडूंना या अद्यावत मैदानावर खेळण्याची संधी मिळावी हेच आमचे उदिष्ट आहे. अशा स्पर्धेद्वारे राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय खेळाडू असा विश्वास मला आहे. क्रिडाप्रेमी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी खेळाडूंना त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले.

*बदलत्या काळात खेळाकडे दुर्लक्ष नको – आ.डॉ.गुट्टे*
वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खेळावर सुध्दा परिणाम झाला आहे. त्यामुळे गावखेड्यातले सांघिक खेळाची जागा मोबाईल मधल्या आधुनिक गेम्सनी घेतली आहे. आता नवी पिढी मोबाईलच्या स्क्रिनवर सर्व काही पाहू इच्छित आहे. त्यामुळे मैदानी ओस पडली आहेत. म्हणून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात वाचनासोबत खेळालाही महत्व दिले पाहिजे. तरच खेळ संस्कृती शिल्लक राहील. त्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष नको, अशी अपेक्षा आ.डॉ.गुट्टे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here