ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी कोणाशी तरी युती केली पाहिजे त्याशिवाय आपले काही खरे नाही! असे म्हणणारे त्याचप्रमाणे कधीकाळी काँग्रेसशी युती नाही म्हणून हमेशा काही लोक नाराजी व्यक्त करायचे अशा एक ना अनेक लोकांची नाराजी आम्ही ऐकत आलो आहे परंतु आज मात्र जेव्हा वंचित व शिवसेना एक येत आहे, तेव्हा आता काय सुरू आहे?. आता ते जुने मुर्दे उखरुन काढून महाराष्ट्र भर ढीढोरा पिटने सुरू आहे!.काल घडून गेलेल्या बासी कडीला उत आणत ते म्हणतात “घरी नाही मीठ अण मागतात विद्यापीठ” असल्या जुण्या वाक्यांची आठवण करून देऊन लोकांच्या भावनेला ते हात घालित आहेत. अशाप्रकारे हे वानर उड्या मारणारे लोक माणसाला धड घोड्यावर असू देत नाही,तर धड पायी चालू देत नाहीत! त्यामुळे आता अशा लोकांना सांगायची वेळ आलेली आहे. की भावांनो भावनिक गोष्टी लवकरच काल बाह्य होत असतात.
त्या लक्षात घेण्यापेक्षा सांप्रत काळात होणाऱ्या युतीपासून आपण काही गमावू शकतो का किंवा काय कमवू शकतो?. हे प्रश्न महत्त्वाचे असते, कोण्या प्रस्थापित सत्ताधाऱ्याशी युती होत असताना तो किती पायऱ्या खाली येतो आणि आपणास किती पायऱ्या वरपुढे चालावे लागते याचा सारासार विचार करून युती करायची असते! तसे तर आपण लोकांनी हमेशा “सिट ऑर नो सिट बट वोट फॉर काँग्रेस!” हा आंबेडकरी चळवळीला मारक असा घर गमाऊ धंदा आमरण करायचा संकल्पच केलेला दिसते! एकदा युतीतून आमचे फक्त चार खासदार काय निवडून आले! तर म्हणे शरद पवारांची मेहरबानी आणि आमच्या मतांवर त्यांचे जेव्हा तेहतीस खासदार निवडून येतात ती कोणाची मेहरबानी? याचा विचारच नाही करत आमचे महाभाग. उलट अशा चर्चांमध्ये निर्लज्जपणे सामील होऊन त्यांच्या या लफंग्या प्रचाराचे तोंड भरून कौतुक करतात.
परंतु आमच्यामुळे महाराष्ट्रात 33 खासदार तुमचे आले तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी ही फक्त आम्हीच तुम्हाला मिळऊन देऊ शकतो! असे रोखठोक प्रतिपादन करायला आमचे तोंड जळते की काय? याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. ज्यांना राजकारणातील डावपेच समजत नाहीत, भविष्याचा राजकीय वेध घेता येत नाही, आपल्या बुद्धी कौशल्याने संधी तर निर्माण करताच येत नाही मात्र आलेल्या संधीचं सोनं सुद्धा करता येत नाही असे राजकारणासाठी निकम्मे व नालायक लोक निष्फळ बाता करून लाता खाण्याचा धंदा करीत आहेत.त्यामुळे असल्या उष्ट्या पत्रावळ्यांवर ताव मारणारांचे आता दिवस राहिलेले नाहीत असे महाराष्ट्रातील जनता त्यांना बजावून सांगणारच आहे! परंतु यांच्या बुडाला आजच का आग लागवी?.
हा खरा प्रश्न आहे वास्तविक जोपर्यंत नगरपालिका व महानगरपालिका त्याचप्रमाणे गाव गाड्यातून सुद्धा जर सेनेचे मत वंचितला ड्रायव्हर्ट झाले तरच पुढील युती शक्य होईल ना? आज कालच्यासारखं तर ठरलं नाहीच! की सीट ऑर नो सीट,बट वोट फॉर सेना? शेवट सांगतो “जो खुद को बिकता नही! ओ किसी के सामने झुकता नही! हम ऐसे शक्ती साथ खडे है!” बाळासाहेब आंबेडकर आगे बढो! हम तुम्हारे साथ है!
✒️जीवन बोदडे(भांबेरी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला)मो:-9689268620