Home महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचे शत्रु नेमके कोण?

छत्रपती शिवरायांचे शत्रु नेमके कोण?

1255

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर समता, बंधुता, न्याय, स्त्रिसन्मान आणि शेतकरी हीत जोपासणारी स्वतंत्र व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजही आदर्श राष्ट्र निर्मिती साठी खुपच प्रेरक आहेत. तरुणांना साठी आदर्श नेतृत्व कसे असायला पाहिजे, संघटन कौशल्य या गोष्टी छत्रपती शिवरायांकडून शिकण्या लायक आहेत. कोणत्याही प्रकारच्या प्रसार माध्यमांचा वापर न करता अठरा पगड जातीचे लोक एकत्र करून मावळे ओळख देऊन जातीवाद संपुष्टात आणल्याचे ऐतिहासीक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. शुर पराक्रामासोबतच स्वराज्याला मानवी नितीमुल्याची जाणीव करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श उदाहरण आहे. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, स्त्रिसन्मान, शेतकरी हितावर आधारित स्वराजाची उभारणी करताना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एकच ओळख देऊन जनहिताचे स्वराज निर्माण करण्याऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अनेक वेळा वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागले.

सत्ता कारणासाठी परकीय शत्रु ऐवजी स्वकीय समजणाऱ्या लोकांनी जास्त दगाफटका, फितुरी करून छत्रपती शिवरायां सोबत गद्दारी केली. स्वराज्य निर्मिती पासून आज पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना डावलण्याचा, फितुरी करण्याचा जो काही डाव आखला जात आहे त्यावरून असे दिसून येते की परकीय शत्रुपेक्षा स्वकीय लोकांची नियत खराब असल्याने त्यांच्या कडूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल काहींना काही गोष्टी करत असतात. भोसले, घोडपडे, निंबाळकर, कुलकर्णी या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत फितुरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेकाला विरोध झाला. सर्वात जास्त दक्षिणा देऊन राज्याभिषेक करण्यात आला आणि तेही राज्यभिषेकांच्या वेळी गागाभट्टाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अवमानास्पद वागणूक दिली. परंतु राज्यभिषेक केल्या शिवाय राजास मान्यता मिळत नव्हती म्हणून राज्यभिषेक करणे आवश्यक होते. थोडक्यात काय तर सुरवातीपासुनच छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वकीय यांच्या पासून विरोध होता, फितुर झाले होते.

परंतु अलिकडकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हिंदुत्वाचा मुद्दा राजकीय लोक करत आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदु मुस्लिम द्वेष पसरवण्याचे काम मेंदुने अपंग असलेल्या लोकांनी केले आहे.आणि देशातील बहुतांश जनतेने छत्रपती शिवाजी महाराज वाचून समजून घेतले नाही तर घाण राजकारण करणाऱ्या आणि छत्रपतींनी शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या टोळीकडून समजून घेतला आहे. बर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना माणतात असे मुळीच नाही. त्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर करून छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करायचे आहे. आणि जनता हिंदुत्वा सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जोडून खोटा आणि अवमान कारण इतिहास जरी सांगितला तरी विश्वास ठेवतात. परंतु कधी इतिहासाची पाने उघडून छत्रपती शिवाजी महाराज वाचणार नाहीत कींवा समजून घेणार नाही. हिंदुत्ववादी पक्ष संघटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मुस्लिम द्वेष करताना समोर करतात परंतु छत्रपतींच्या स्वराज्यात प्रमुख खाते मुस्लिमांकडे होते आणि आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द बोलणारा एकही मुस्लिम नाही हे ज्यांना कळत नाही त्यांचा मेंदु नेमका काय कामाचा?

हिंदुत्वाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोत्र बदलले तरी अपवाद वगळता लोकांना काहीच फरक पडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोत्र बदलले तरी लोकांनी त्यांचे समर्थन केले आणि आजही करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकिचा इतिहास सांगुन गोत्र बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करतात आणि बाकीचे केवळ हिंदुत्व शब्दांमुळे गप बसत असतील तर चुकीचा इतिहास लिहण्याऱ्या सोबतच ज्यांनी इतिहास मान्य केला आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन दिले ते लोक सुद्धां छत्रपती शिवरायांचे शत्रुच आहेत. शेंदूर फासलेल्या दगडाच्या वेदना लोकांना होतात पण छत्रपतींचे गोत्र बदलल्याच्या वेदना लोकांना होत नाहीत एवढी माणसिक गुलाम लोक हिंदुत्वाच्या नावाखाली झालेले आहेत. बालाजी संस्थानाच्या चेक पॉइंट वर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा असल्याने गाडी अडवण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा झाकून ठेवण्याचा सल्ला दिल्यानंतर गाडी सोडण्याचे सांगण्यात येते. तरीही लोकांना काहीच वाटतले नाही.

बालाजी संस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नाकारते आणि स्वतः ला छत्रपतीचे मावळे, छत्रपतीच्या जातीचे, मातीचे समजणारे लोक बालाजीला सर्वस्व माणतात. ज्या बालाजीला छत्रपती शिवराय चालत नाहीत, तर छत्रपतींच्या मावळ्यांना बालाजी चालतो तरी कसा? परंतु व्यवस्थेने बहुजन समजाला एवढे गुलाम बनवले आहे की लोकांना फक्त हिंदुत्वाचा झेंडा मिरवणाऱ्या लोकांनी सांगितलेलीच गोष्ट खरी वाटते बाकी त्यांना कशाशीच काही घेण देण नाही म्हणजे छत्रपतीचे नाव घेणारेच छत्रपतीचे खरे शत्रु आहेत याची प्रचीती येते. कर्नाटक सरकारने, मध्य प्रदेश सरकारने केलेला छत्रपती शिवरायांचा अवमान केला पण फक्त बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी त्याला विरोध केला बाकीचे मुग गिळून गप्प बसले. छत्रपतींचा अवमान झाल्यावर लोकांना गप्प कसे बसु वाटतं? आज स्वतः ला हिंदुत्ववादी समजणाऱ्या लोकांनी स्वतः ची मत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला तरी यांना काही घेणे देणे नाही. हिंदुत्वाचा झेंडा मिरवणारे पक्ष संघटना जोपर्यंत काही सांगत नाहीत तोपर्यंत लोक गप्प च बसतात, आणि हिंदुत्ववादी संघटने सांगितले तर लोकांच्या कत्तली देखिल करतात.

परंतु छत्रपती च्या अवमानाच्या वेळीच कोणीच आक्रमक होत नाही एवढे लाचार लोक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो मुळे खोले बाईच्या घरातील गणपतीचा निवद अपवित्र होतो, पण कोणीच काही बोलले नाही कारण हिंदुत्ववादी संघटना पक्ष गप्प बसले होते. तोच प्रकार समोर अनेक लोकांनी केला आहे. छत्रपतींचा अवमानाची मालीकाच सुरु केली आहे. बर विषेश हे सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांच्या शी संबंधित आहेत. ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल कोणी अपशब्द बोलल्या नंतर प्रतिक्रिया देण्याची, सत्य बोलण्याची, आवाज उठवण्याची भिती वाटत असेल तर ते जिवंत मुडदे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ऐऱ्या गैऱ्या भ्रष्ट लोकांशी करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होतो. छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचे बोलले जाते तरी आणि सरकार दरबारी त्यांचे संरक्षण होते हिच खरी शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांची तुलना आजच्या नेत्यांशी का होत नाही हे समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे होते, शेतकऱ्याच्या मेथीच्या जुडीला धक्का न लागु देणारे आणि शेतकऱ्यांच्या गवताची काडी सुद्धां गहानात राहु नये अशी व्यवस्था निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहेत. परंतु आज जर बघितले तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सोबतच शेतकरी सुद्धां कुठेना कुठे गहानात आहे, थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आदर्श व लोकहीताची व्यवस्था मोडणाऱ्या लोकांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत होऊ शकत नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून मावळा ही सर्व समावेशक ओळख देऊन कल्याणकारी राज्य उभे करणारे छत्रपती यांची बरोबरी कोणीच करु शकत नाही. आज जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून, एका जातीला दुसऱ्या जातीमध्ये वाद घडवून, इतर जातीवर अन्याय करण्याचे संरक्षण करणाऱ्या लोकांना छत्रपतीच्या स्वराज्यातही राहण्याचा अधिकार नाही, अशा लोकांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत करणे म्हणजेच छत्रपती शिवरायांचा अवमानच होय.

आपण ज्वलंत उदाहरण बघितले तर राज्यपाल म्हणतात शिवाजी जुन्या काळातील आदर्श होते म्हणजे आज नाहीत, त्या नंतर एक आमदार बरगळला अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोथळा बाहेर काढला, डोक्यात मेंदु नसलेला एक त्रिवेदी नावाचा व्यक्ती बरगळला कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच पत्र लिहले, या सर्वांची पाठराखण करणारे माजी मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केलाच नाही. एक गोष्ट आजही लोकांना कळत नाही. काहीना काही कारणा वरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द काढला जातो. छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्या नंतरही लोक आक्रमक होत नाहीत, आवाज उठवत नाहीत याचे मुळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द काढणारे हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षाचे लोक असतात, आणि सध्या हिंदुत्ववादी पक्ष संघटनेचेच लोकांना सत्य वाटतं, त्यांनी सांगितले तेव्हाच लोक आक्रमक होतात. म्हणून मनात नेहमी एकच प्रश्न येतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा मोठा पक्ष, संघटना किंवा नेता कसा होऊ शकतो

आत्मविश्वास हेच मोठे सामर्थ्य!

जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ जर कोणाला लोक समजत असतील हा छत्रपतींचा अवमान आहे. आणि छत्रपतींचा अवमान करणारे, आणि अवमान झाल्यावर गप्प बसणारे, फक्त संघटना पक्ष यांनी सांगितले तेव्हाच रस्त्यावर येणारे लोक खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे शत्रु आहेत.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव,ता.मेहकर)मो:-९१३०९७९३००
*************************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here