✒️लऊळ(पुरोगामी न्युज नेटवर्क)
लऊळ(दि.2डिसेंबर):-माढा तालुक्यातील मौजे लऊळ गावचे महंत श्री रघुनाथगिरी महाराज यांचे हृदयविकारामुळे गुरूवार दि. 1 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी आकस्मित निधन झाले. त्यांचा नाथपंथीय धर्मपद्धतीनुसार अंत्यविधी अर्थात समाधिस्त दफनविधी केम येथील महंत जयंतगिरी महाराज आणि त्यांचे नाथपंथीय सहकारी यांच्या आधिपत्याखाली सायंकाळी 7 वाजता करण्यात आला. महंत रघुनाथगिरी महाराज यांच्या पश्चात त्यांची धर्मपत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नाती असा कौटुंबिक परिवार आहे.
मौजे लऊळ येथील ढोरे वस्तीवरील नाथमंदिर शिवपीठ येथे नाथपंथीय धुळवड विधी शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी तर हिंदू धर्मपद्धतीनुसार दशक्रिया विधी शनिवार दि 10 डिसेंबर रोजी होणार आहे. तसेच शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी नाथपंथीय सोळावा विविध महंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.महंत रघुनाथगिरी महाराज यांनी 2002 साली हरिद्वार येथील महंत रामगिरी महाराज यांच्याकडून नाथपंथीय दीक्षा घेतली होती. त्यानंतर 2003 साली महंत रघुनाथगिरी महाराज यांनी ढोरे वस्तीवर एक एकरच्या विविध वृक्षांच्या निसर्गरम्य परिसरात भव्यदिव्य महादेव मंदिर व दत्त मंदिर उभारून नाथपंथीय शिवपीठ आश्रमाची स्थापना केली होती.
महाराष्ट्रातील जनसामान्य भक्तगण यांच्या नानाविध समस्या, अडचणी सोडवून महाराजांनी आपला लौकिक आणि ख्याती मिळविली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांचे मार्गदर्शनपर आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या लऊळ येथील आश्रमात हजेरी लावत असत. माणसाने सत्याने वागावे, सद्विचार आणि सुसंगतीने मानवाने आपला जीवन व्यवहार पार पाडावा, कोणाचाही द्वेष अथवा निंदा करू नये, प्रत्येक घरातून एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात व्हायला हवी. आपण नेहमी शुद्ध व सात्त्विक आहार घेणे स्वस्थ मानवी जीवनाकरिता आवश्यक आहेत. भक्तीभावाने आचरण असावे. सर्व काही सृष्टीनियंता भगवंताच्या हातात आहे.
आपण मन चित्त प्रसन्न ठेवून जीवन जगावे. प्रकृती पण आपल्या नियमाने चालते. दिवस-रात्र, महीने ऋतू सर्वे काही नियमाने चालत आहे. जगातील सर्व व्यवहार एका नियमबद्ध चाकोरीत चालतात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थित रीतीने पार पडतात. हे सर्व जगाच्या कल्याणाकरिताच होच असते. म्हणून मानवसमाजाने पण आपले जीवन सुखी होण्याकरिता चांगले सुसंस्कार बाणवायला हवे. असे सर्वश्रेष्ठ सद्विचार ते नेहमी आपल्या भक्तांना सांगत असायचे.
सदर आश्रमात प्रत्येक वर्षी महंत व भक्तगण दत्त जयंती, महाशिवरात्री आणि गणपती उत्सव मोठ्या उत्साहात व मनोभावे साजरे करतात. तसेच प्रत्येक गुरुवारी दत्तगुरूची आरतीवेळी बहूसंख्य भक्तगण हजर राहत व महाप्रसादाचा लाभ घेत असत. महंत रघुनाथगिरी महाराज यांनी निर्माण केलेला हा आध्यात्मिक वसा आणि वारसा पुढे त्यांचे सुपुत्र श्री सिद्धेश्वर ढोरे (महाराज) अधिक भक्तिभावाने चालवतील.
दिव्यांग असूनही “तो” करतो आहे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी