✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.1डिसेंबर):- माहे जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी जाहीर केली तत्काळ शेतकऱ्यांचा खात्यात रक्कम जमा करा असे आदेश देऊन सुध्दा जिवती तालुक्यातील शेणगाव साज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित असुन शासनाच्या आदेशाला पायमल्ली तुडवण्याचे काम शेणगाव साज्यातील तलाठी रमेश उमरे यांनी केली आहे.
शेतकंऱ्याना तलाठी कार्यालयात कामा निमित्त यावे लागते. सातबारा, फेरफार पंजी,उत्पन्न दाखला, दुरुस्ती प्रमाण पत्रा साठी शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपये मोजावे लागतात रक्कम दिले नाही तर सातबारा इतर कागदपत्रे मिळणार नाही. शेतकऱ्यांन सोबत उर्मटपणा ची भाषेचा वापर करून अपमानित करतात.कार्यालयात रमेश उमरे तलाठी मधप्राशन करुन येते आणि दारुच्या नशेत शेतकऱ्यांना धमकावतात.माझी तक्रार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे करा मी कुणालाही घाबरत नाही. या भाषेचा वापर करून शेतकऱ्यांना धमकी देतात.
जे शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांचा खात्यात तत्काळ रक्कम जमा करा.रमेश उमरे तलाठ्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तत्काळ रमेश उमरे पटवाऱ्याची बदली करण्यात यावी अतिवृष्टीच्या रक्कमे पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार जिवती यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन देताना हाकानी शेख तालुकाध्यक्ष, मोकिंद राहुळवाड तालुका सचिव, शिवाजी शिवमोरे, इतर पदाधिकारी उपस्थित होते