विश्वामित्र नावाचे क्षत्रिय महर्षी वैज्ञानिक होते. त्यांना स्वतंत्र विश्वाची निर्मिती करायची होती. तशी सुरूवात झाली. स्वर्गातील देव मंडळींना चिंता पडली कि, हा कोण मानव , पृथ्वीवर नवीन विश्व निर्माण करीत आहे?त्यासाठी ब्रम्हचर्य पालन करतो. ना घर ना दार ना संसार.खूपच हटवादी असावा.असे तर देवांनाही शक्य झाले नाही.आणि हा मानव शक्य करू पाहात आहे.देव मंडळी ची इंद्र देवाच्या अध्यक्षतेखाली सभा भरली.चर्चा झाली.खलबते झाली.काहीतरी उपाय शोधला पाहिजे.या मानवाची कमजोरी ओळखली पाहिजे.आहार,निद्रा,भय, मैथुन,काम ,क्रोभ,लोभ,मद,मत्सर ,मोह असा कोणतातरी दुर्गुण शोधला पाहिजे.या मानवाने या संपूर्ण गुणदोषावर नियंत्रण मिळवलेले आहे.याचे मिशन फेल करणे शक्य नाही.तेंव्हा इंद्र देव ताडकन उठून उभे राहिले.
“नाही ! नाही! नाही!मानव ,दानव,देव सुद्धा ‘काम’ वर नियंत्रण मिळवू शकत नाहीत.मुळातच त्याची निर्मिती करतांना, मानवाचे, दानवाचे शरीर असेम्बल करतांना ईश्वराने तसे सर्वच स्पेअर पार्ट वापरलेले आहेत.एक मेल मॉडेल, दुसरी फिमेल मॉडेल. असे मॉडेल असेम्बल करून त्यात उपरोक्त सर्व गुणदोषाचे प्रोग्रामींग इनबिल्ट केलेले आहेत.यातून विश्वामित्र वेगळे नसावेतच.आम्ही देव सुद्धा वेळप्रसंगी स्वताला आवर घालू शकत नाहीत.हा तर एक मानव आहे.माझा आदेश आहे कि, यासाठी एका अप्सरेची नियुक्ती करावी. देखणी, लावणी, गायीका, नर्तिका अशी मेनका हे काम लिलया करू शकते. सेक्रेटरी चित्रगुप्त महोदय ताबडतोब तसा आदेश काढा.”
आदेश निघाला. मेनका मेणात बसून विश्वामित्रांच्या आश्रमात उतरली. नटरंग सिनेमात तिच्या आगमनाचे वर्णन केले आहे.
“महर्षी गुरूदेव,तुमच्या विश्वात फिमेल कैरेक्टर ची कमी राहू नये म्हणून मी तुम्हाला मदत करायला आली आहे. आपण माझी सेवा सहर्ष स्विकारावी.”
“मेनके,तू माझ्या पासून लांब राहा. मी नवीन विश्व बनवण्यासाठी ब्रम्हचर्य पालन केले आहे. तू त्यात खोडा घालु नकोस.”
“महर्षी, जशी तुमची आज्ञा. मी सर्व काम टेलिस्कोपीक मेथड ने करीन. चिंता नसावी. पण मला गायनाची, नृत्याची आवड आहे.तुमच्या या रूक्ष जिवनात , दगड माती, झाड पहाड च्या विश्वात माझे मन रमणार नाही. तर माझे मन रमण्यासाठी तितकी परवानगी असावी.”
मेनकाने आपले काम सुरू केले. इंद्र देवांच्या आदेशानुसार केले. देवांचे इंद्र ते. मेनका यशस्वी झाली. विश्वामित्राचे ब्रम्हचर्य डळमळीत झाले. नवीन विश्वाची निर्मिती थांबली. देवांचे मिशन सक्सेस आणि मानवाचे मिशन फेल ठरले.त्यानंतर विश्वामित्र सारखा कोणीही पुन्हा प्रयत्न केला नाही.नवीन विश्व निर्माण झाले नाही. म्हणून एकाच विश्वात मरेपर्यंत मन मारून जगावे लागते. जसे जळगाव शहरातील रस्त्यांवर खरडत रखडत चालावे लागते, रडत कण्हत जगावे लागते. एक चप्पल पायात, दुसरी चप्पल हातात घेऊन मॉर्निंग वाक करावे लागते. कारण जळगाव चे विश्वामित्र अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये रंभा, मेनका बरोबर रममाण झालेले आहेत.
योग गुरू रामदेव बाबा ब्रम्हचारी राहाण्याचा खूप प्रयत्न करीत आहेत. ते जेवण सुद्धा करीत नाहीत. म्हणे जेवणाची गरज नाही, म्हणून अन्नाची गरज नाही, म्हणून शेतीची गरज नाही. ते कपडे सुद्धा शिवत नाहीत. मशीनची गरज नाही. रंग सुद्धा एकच. भगवा. ज्यात मानव वाटत नाही. पण आतले सर्वच मॉडेल मानवाचे आहे.मानवाचे सर्वच स्पेअर पार्ट ईश्वराने जोडलेले आहेत. बाबांची खूप ईच्छा असावी कि आपण ही नवीन विश्व निर्माण करावे. या पृथ्वीतलावरील रंभा, मेनका ,अप्सरा बाबांना अधुनमधून छेडत असतात. बाबा सुद्धा त्यांना तितक्याच आत्मियतेने जवळ घेतात. वाटसअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम,शेयर इट,ब्ल्यू ट्यूथ चा उपयोग करीत असतात. त्या सर्वच शेयरींग एपचे मेसेज चा अभ्यास केला असता बाबा सुद्धा ढळमळीत होतात. ईश्वराने मेल मानवाचे सर्वच स्पेअर पार्ट, काम्पोनन्ट, प्रोग्राम त्यात इन्स्टाल केलेले आहेत. इनबिल्ट आहेत. ते डिफाल्ट फन्क्शन करणारच. ते डिफेक्टिव्ह होईपर्यंत डेरीव्हेटिव्ह फन्क्शनेबल असतात. म्हणून मानवाने प्रॉडक्शन फॅक्टरीच्या विरोधात प्रयत्न करू नये.
प्रकृती विरोधात जे करतात त्याला विकृती म्हणतात. निसर्गाला विसर्ग आवश्यक असतो. अन्यथा अपसर्ग होऊ शकतो. असाच प्रकार बाबांच्या बाबतीत झाला. जे विश्वामित्रांना शक्य झाले नाही ते रामदेव बाबांना शक्य होईल असे वाटत नाही. पृथ्वीतलावरील मानव, दानव जातीला गृहस्थाश्रम हाच एकमेव चांगला मार्ग आहे. त्यातून पळ काढणे बरे नव्हे! ब्रम्हचर्य हा ज्ञानाचा मार्ग आहे. गृहस्थाश्रम हा उत्पत्तीचा मार्ग आहे. उत्तम व्यवहारे जोडुनिया धन! बायको पोरांमधे रमवावे मन!! वानप्रस्थाश्रम नकारात्मक दिशेने जाणारा मार्ग आहे. नको नको, आता नको. सन्यासाश्रम हा ईश्वराप्रत परत जाण्याचा मार्ग आहे.
प्रश्न पडला कि, इलेक्ट्रॉन आणि प्रोट्रॉन मधे कोणतेही फिजीकल अटॅचमेंट नसतांना इलेक्ट्रॉन हा प्रोट्रॉन ला सोडून दूर का जात नाही? पण क्वाटंम थेअरी सांगते कि, त्यांच्यातील इंटर्नल फिलींगमुळे मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. त्यामुळे एक्स्टर्नल मोव्हमेंट होते. त्यातून इमोशनल बॉंडिंग निर्माण होते.तसाच प्रकार विश्वामित्र आणि मेनका यांच्या बाबतीत झाला असावा.
साधुचे अंतरंग जाणावे कैसे?
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!
✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव