✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- 28/11/22 क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३१ व्या स्मृतिदिनानिमित्ताने धरणगाव येथील बालाजी नगर येथे समस्त माळी समाज पंचमंडळाचे समाजाचे कोषाध्यक्ष श्री व्हि.टी.माळी सर यांच्या हस्ते व व संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष दिनेश महाजन, शहराध्यक्ष रवी महाजन, संघटनेचे सदस्य विठोबा महाजन, सामाजिक कार्यकर्ते आबा महाजन, त्याचप्रमाणे येवले सर्विस चे संचालक अण्णाभाऊ येवले, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.