Home महाराष्ट्र रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहाने साजरा

रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहाने साजरा

280

✒️सावली(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सावली(दि.27नोव्हेंबर):- रमाबाई आंबेडकर विद्यालय व ज्यु. कॉलेज, सावली येथे शनिवारी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.”भारतीय संविधान दिना”च्या शुभमुहूर्तावर शहरातील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “संविधान रॅली” काढली. शाळेच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था, सावली अध्यक्ष श्री.के.एन.बोरकर होते तर सचिव प्रा.सौ.व्ही.सी.गेडाम, संचालक श्री.बी.के.गोवर्धन, श्री.व्ही.के.बोरकर, सौ.सी.आर.गेडाम, ऍड. आंबटकर, अॅड. गेडाम, यांची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. आंबटकर आणि अॅड. गेडाम यांनी प्रत्येक भारतीयासाठी संविधानाचे महत्त्व विशद केले.

त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार आणि भारतीय राज्यघटनेतील विविध कलमांची माहिती करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.के.एन.बोरकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय, समता, बंधुता याविषयी सांगितले. यावेळी वैशाली मोटर्सचे मालक श्री.उमेश प्रभाकर गेडाम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 100 वह्यांचे वाटप करण्यात आले. भाजप युनिट, सावली यांनी शाळेला संविधान प्रास्ताविकेची फोटो फ्रेमही भेट दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एल. बनसोड सर यांनी केले तर श्री.आर.सी. चौधरी सर यांनी आभार मानले.

चातुर्वण्य व जातिभेद मानवनिर्मित उपद्व्याप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here