🔹हजारो लोकांची उपस्थिती सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
शंकरपूर(दि.27नोव्हेंबर):-येथील ग्रामपंचायत तर्फे संविधान दिनानिमित्त जागर संविधानाचा हा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ घेण्यात आला सार्वजनिक पद्धतीने हजारो लोकांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत ने हा प्रथमच कार्यक्रम घेतला आहे याच कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थी व नाट्य कलावंत आणि माजी सरपंच यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार डॉक्टर अविनाश वारजुकर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोवा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉअनमोल शेंडे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ सतीश वारजुकर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागभीड येथील साहित्यिक प्रा संजय येरने माजी प्राचार्य तथा ग्राम गीताचार्य राम राऊत नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शैलेश वाघधरे ज्येष्ठ पत्रकार आनंद भीमटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे सरपंच साईश वारजूकर यांची उपस्थित होती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती रोशन ढोक किशोर अंबादे बळवंत ठवरे ओम खैरे काकाजी वाघमारे वामन डांगे ऍड जयदेव मुन डॉ नवाज शेख अरविंद गायकवाड निखिल गायकवाड आत्माराम ढोक माजी प स सदस्य नर्मदा रामटेके शहरूस्तम बनसोड सीताबाई गायकवाड सपना घडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात माजी सरपंच मीरा गजभे दिक्षा भगत तसेच स्पर्धा परीक्षेत पास झालेले आशिष चौधरी आकाश कन्नाके आणि नाट्यकलावंत तथा लेखक संजय बघेल योगा शिक्षक गजानन कापसे तसेच गावातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पोलीस पाटिल अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा शाल व संविधान देऊन सत्कार करण्यात आलेला आहे याच कार्यक्रमात यवतमाळ येथील मनोज राजा गोसावी यांचा सामाजिक प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय गजबे प्रा अमोद गौरवकर प्रास्ताविक रोशन ढोक तर आभार भावना बावनकर यांनी मानले