Home चंद्रपूर समरसतेचा संविधान दिन साजरा

समरसतेचा संविधान दिन साजरा

192

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27नोव्हेंबर):- समाज कल्याण विभाग चंद्रपूर व समरसता मंच चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून उद्देशिकेचे वाचन व संविधान अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती धनंजय साळवे गटविकास अधिकारी गडचिरोली, डॉ नंदकिशोर मैदळकर समरसता मंच संयोजक चंद्रपूर. सुदर्शन नैताम, कोमल आक्केवार सेवा दल वस्तीगृह अधीक्षिका, गंगाधर गुरनुले, राजाभाऊ पेटकर, पार्वता पुनवटकर चोखामेळा वस्तीगृह अधीक्षक, विकास कासारे आंबेडकर वस्तीगृह अधीक्षक, प्रशांत निब्रट दर्पण वस्तीगृह अधीक्षक, वाढई ताई स्नेहा वस्तीगृह अधीक्षिका, प्रबोधन भगत बहिणाबाई वस्तीगृह अधीक्षक, कविता शेंडे, समीर ठाकरे, स्वप्नील शेंडे, शोभा खाणकुरे, कांता बुंदिले, रत्नाकर कांबळे, ममता पुणेकर, किरण नरड, जिब्राइल शेख, सचिन बरबटकर, नितीन चांदेकर, गणेश कन्नाके, गौरव अक्केवार, विनोद करमरकर, किशोर जमपलवार, स्वप्निल सूत्र पवार, पिंटू मून व सर्व वस्तीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कर्मचारी उपस्थित होते संविधान दिनानिमित्त मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली.

रॅली द्वारे जनतेच्या मनामनात संविधानाविषयी सन्मान जागृत व्हावा याकरिता नारे देऊन जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला रॅलीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून उद्देशिकेचे वाचन करून प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.

चातुर्वण्य व जातिभेद मानवनिर्मित उपद्व्याप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here