Home चंद्रपूर संविधानाच्या संरक्षणासाठी बहुजनांनी एकत्र येण्याची गरज : प्रभाकर लोथे

संविधानाच्या संरक्षणासाठी बहुजनांनी एकत्र येण्याची गरज : प्रभाकर लोथे

87

🔹राष्ट्र सेवा दलातर्फे संविधान प्रास्ताविकेचे वितरण

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.26नोव्हेंबर):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांगसुंदर असे संविधान भारत देशाला बहाल केले. तळागाळातील, दीनदलित, मागासवर्गीय, ओबीसी, स्त्रिया यांना अधिकार प्राप्त करून दिले. जगण्याचा अधिकार दिला. देशाला भक्कम अशी लोकशाही प्रदान करुन दिली. असे असताना काही लोक ही लोकशाही संपवू पाहत आहेत. संविधान धोक्यात आले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आपल्या बहुजन समाजाने एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर लोथे यांनी केले. राष्ट्र सेवा दल आयोजित संविधान दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुकबधिर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवा दलाचे मोतीराम कुळमेथे, प्रभाकर पिसे, नीलकंठ शेंडे आदी उपस्थित होते.

प्रमुख अतिथी मोतीराम कुळमेथे, प्रभाकर पिसे, नीलकंठ शेंडे, रामदास कामडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रकाश कोडापे यांनी संविधानावर कविता सादर केली. तालुक्यातील पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दल तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रास्ताविका, सन्मानचिन्ह व आमदार कपिल पाटील लिखित पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

संविधान दिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक,अंगणवाडी ताई, वकील यांना संविधान प्रास्ताविकाचे वितरण याप्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमाला इम्रान कुरेशी, माधुरी वीर,नितीन रामटेके,रमेश दांडेकर,श्रीकृष्ण जिल्हारे, शकील शेख, कवडू लोहकरे,सुरज मोरे, आशिष वाघमारे, कवडू निकेश्वर, पानसे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे यांनी केले. संचालन राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष रावण शेरकुरे यांनी केले. आभार कैलास बोरकर यांनी मानले. आयोजनासाठी राष्ट्र सेवा दल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुकबधिर विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here