✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.26नोव्हेंबर);-दि. 26 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारला भगवतीदेवी विद्यालय, देवसरी येथे सकाळी7.30वा. निसर्गरम्य परिसरात राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान कवायत परिपाठ व चालता बोलताचे पाचवे पुष्प झाल्याबरोबर संविधान दिन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल अल्लडवार तर प्रमुख पाहुणे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक दिनेश वानरे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रथमता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प फुलांनी पूजन केले. त्याचबरोबर सर्व उपस्थित गुरुजींनी प्रतिमेचे पूजन केले. सर्व उपस्थितांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर गीत गायन व विचार व्यक्त केले कु. तेजस्विनी पाईकराव पल्लवी सावते ममता शेवाळे समीक्षा राणे सुजल राणे राधिका वानखेडे कोमल वानखेडे तर चालता बोलता या कार्यक्रमाचे बक्षीस प्रथम वैष्णवी कदम द्वितीय मंजुषा रावते तृतीय विद्या शिंदे यांना मिळाले या तर या कार्यक्रमाला विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख दिगंबर माने शेख सत्तार राजेश सुरोसे भागवत कबलेअरविंद चेपुरवार मारुती महाराज यांची उपस्थिती होती. प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन विद्या शिंदे या विद्यार्थिनी केले. तर आभार प्रदर्शन खुशी विनायते यांनी केले तर पुढील चालता बोलता कार्यक्रमाचे बक्षिसाचे प्रायोजक इंग्रजी विभाग प्रमुख श्री शेख सत्तार सर यांनी जाहीर केले. अतिशय बहारदार कार्यक्रम झाला हे विशेष म्हणावे लागेल.