✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.25नोव्हेंबर):-तालुक्यांतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांकरिता शिक्षकांचे एक आगळे वेगळे, “झाडू लगावो धरणे आंदोलन” पाहायला मिळाले. प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने व पंचायत समिती शिक्षण विभागातील बेशिस्त दूर करण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चे वतीने हे आंदोलन करण्यात आले. सस्यांवरील विविध घोषवाक्ये, समस्या मांडणारे “झाडू लगावो गीत”, समस्यांवर झाडू लावण्याचे पथनाट्यातून सादरीकरण, शेकडो च्या संख्येने असलेली शिक्षकांची उपस्थिती हे या आंदोलनाचे लक्ष वेधून घेणारे आगळे वेगळे वैशिष्ट्ये होते.
मागील दोन वर्षांपासून इनकम टॅक्स गहाळ कपात असणे, सहा महिन्यांची DCPS ची गहाळ रक्कम, LIC चे कपात हफ्ते जमा न होणे, मनमानी पद्धतीने केंद्रप्रमुख पदाचा प्रभार देने, सेवानिवृत्त शिक्षकांचे विविध लाभ न मिळणे, रजा प्रवास सवलत, वैद्यकीय देयके निकाली न निघणे, शिक्षकांना कार्यालयात धमकावणे, विविध कामाकरिता लिपकांद्वारे त्रयस्थ व्यक्तींचे नाव सांगणे, वैद्यकीय देयके, एकस्तर, सेवा पुस्तके सेवा पडताळणी करिता न पाठवणे, आदी समस्यांना धरून आंदोलन करण्यात आले.
समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनातून देण्यात आला. आंदोलन च्या यशस्वितेकरिता नारायण कांबळे, गोविंद गोहणे, रवींद्र वरखेडे, जनार्दन केदार, ताराचंद दडमल, सरोज चौधरी, गोवर्धन ढोक, अतुल निवडिंग, प्रदीप गौरकर, परीक्षित टाकसाळे, सचिन शेरकी, सलीम तुरके, संदीप मेंढुले, राजू चांदेकर, रमेश मिलमिले, कल्पना महाकाळकर, वंदना हटवार, रुपमाला गजभे, वर्षा निमजे, मनीषा आष्टनकारआदी महाराष्ट्र पुरीगामी शिक्षक समिती चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले