Home महाराष्ट्र शिक्षकेत्तरांच्या सन्मान व न्याय हक्कासाठी अध्यापकभारतीचा पुढाकार…

शिक्षकेत्तरांच्या सन्मान व न्याय हक्कासाठी अध्यापकभारतीचा पुढाकार…

147

🔹अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्ऩ

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शातांराम दुनबळे)

नाशिक(दि.24नोव्हेंबर):-शाळा-महाविद्यालये तथा शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्य प्रक्रियेत प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींचा शाळा-महाविद्यालयातील व्यवस्थापन कार्यात बहुमोल योगदान असून शिक्षकेत्तरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबळ संघटन असण्याची गरज असल्याचे मत येथे आयोजित शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात मान्यवरांनी व्यक्त केले.

अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी दिनाचे औचित्य साधून येवला तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा अध्यापकभारती ह्या राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला.शिक्षकेत्तर कर्मचारी देत असलेली सेवा हि बहुमोलची असून त्यांच्या ऋणातून समाजाला उतराई होता येणार नसल्याचे प्रतिपादन ह्या वेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक सुरेश खळे यांनी केले.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब गोरे हे होते.येवला मर्चंड बँकचे नवनिर्वाचित संचालक सुभाष भाऊ गांगुर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर शिक्षकेत्तर कर्मचारी संजय जाधव सर (गवंडगांव),गोरे सर कुसुर,गायकवाड सर धामोडे,राजेंद्र दराडे,गोरख खराटे,लक्ष्मण दाणे,बी.डी.खैरनार,संजय फरताळे,विश्वास जाधव,आनंदा जाधव,आब्रार सर,वसंत पवार,रावसाहेब खराटे,शैलेश आहिरे,नाना काळे आदी मायनवर व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र वाघ तर सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here