🔹ब्रम्हपुरीला अवैद्य धंद्यापासुन वाचविणारे नेतृत्व केव्हा मिळेल?
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 24नोव्हेंबर):- तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रालगत अनेक गावातून नद्यांचे पात्र मोठ्या प्रमाणात पोखरल्या जात आहे. अर्हेर- नवरगाव, रानमोचन, बोढेगाव, बरडकीन्ही, आवळगाव, या गावातील नदीपात्रातून रेती मोठ्या प्रमाणात पोखरने सुरू आहे . हे जर असेच सुरू राहीले तर भविष्यात रेतीचे पक्के घरं सोडून पिवळ्या मातीचे कच्चे घर बांधायला जनसामान्यांना मजबूर व्हावे लागणार. मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्याने जणूकाही नदीपात्रात मातीच उरल्याचे भास होऊ लागले आहे.
तर रेतीच्या भावाने गगनभरारी घेतली आहे. जे जनसामान्यांना परवडणारे नाही आहे. घाट लिलावात नसताना बेधडक रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर धावत आहेत. त्यामुळे महसूल विभागाला चांगलाच आर्थिक चुना लागत आहे.या रेती अवैद्य धंद्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. ब्रम्हपुरीला अवैद्य धंद्यापासून वाचविणारा चांगला नेतृत्व अधिकारी केव्हा लाभेल या प्रतीक्षेत जनसामान्य आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी रेतीमाफियांच्या वेळीच मुसक्या आवळल्या नाही तर भविष्यात ब्रम्हपुरी रेती माफियांराज म्हणून ओळखल्या जाईल. याचा दुष्परिणाम सरळ नवीन तरुण वर्गावर पडेल . म्हणूनच एक चांगला नेतृत्व अधिकारी ही ब्रम्हपुरीची गरज आहे असं जनसामान्यांकडून बोलल्या जात आहे.