✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागभिड (दि.19 नोव्हेंबर):–येथे तालुका स्तरावर तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले असून त्यात जलतरण तलाव निर्माण झाले असून ते पर्यटन व्यवसाय करिता सुरू व्हायला पाहिजे होते.परंतु देखभाल,दुरुस्ती आणि स्वच्छ पाणी यासाठी अजून पर्यंत कोणत्याही विभागांनी जबाबदारी घेतली नसल्याने जलतरण तलाव व त्यातील पाणी साचून खराब झाले असल्याचे दिसून येत आहे.
तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्यात चार कोटी खर्च करून त्यावर देखभाल,दुरुस्ती आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यावर सर्व काही अवलंबून आहे.जलतरण तलाव चे उद्घाटन करण्यात आले असून त्याचा वापर करण्यासाठी कोणत्याही विभागांनी जबाबदारी घेतली नाही यामुळे जलतरण तलाव धूळ खात पडून आहे.
आमचे प्रतिनिधी यांनी जलतरण तलाव सुरू न झाल्याने पाणी साचून राहत असल्याने खराब झाले आहे यासाठी कोण जबाबदार?. सार्वजनिक बांधकाम विभाग की नगर परिषद. या संदर्भात मुख्याधिकारी कंकाल यांचेशी संपर्क दिसून येत आहे.कोटी रुपये खर्च करून वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जिल्हाधिकारी यांनी योग्य निर्णय जनतेच्या सेवेसाठी खुला करावा अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे