🔹वरुड तालुक्यातील भाविकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !
✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वरुड(दि.19नोव्हेंबर):-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील ३ तीर्थक्षेत्र यांना ब दर्जा प्राप्त करून दिला आहे. यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सतत पाठपुरावा केल्याने तालुक्यातील या तीर्थक्षेत्र यांना ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघात पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकास कामे करण्यास मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातुन मंजुर कामांना निधी उपलब्धतेसाठी तसेच नविन प्रस्तावित कामांना मंजुरात देण्यासंदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे बैठक घेऊन प्रधान सचिव ग्राम विकास विभाग यांच्याकडे १५ जुलै २०२१ रोजी मोर्शी विधानसभा मतदार संघातील लोणी येथील वंदनिय वसंतदास महाराज संस्थान, आमनेर येथील सय्यद शहा जलाउदीन दर्गा, लिंगा येथील श्री. दादाजी धुनीवाले दरबार लिंगा या “क” वर्ग तिर्थक्षेत्र स्थळाला “ब” वर्ग दर्जा मिळन्यासाठी परिपुर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करून प्रस्तावीत “क” वर्ग तिर्थक्षेत्र स्थळास “ब” वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा देऊन सदर तिर्थक्षेत्र विकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे या तीर्थक्षेत्रांना ब दर्जा प्राप्त झाला असून तसा शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२२ ला ग्रामविकास विभाग महाराष्ट्र यांनी जाहीर केला आहे. यामुळे वरुड तालुक्यातील लोणी आमनेर, लिंगा या तीर्थक्षेत्र यांचा काळापालट होणार आहे. या साठी नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार व्यक्त केले आहे.
वरुड तालुक्यातील लोणी आमनेर लिंगा येथे विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवाला हजारो भक्त उपस्थित असतात. मंदिर ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. आमदार देवेंद्र भुयार यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देण्याचे जाहीर केले आहे. या तीर्थ स्थळांना ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या समितीने वरुड तालुक्यातील ३ स्थळांना ग्रामीण ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये लोणी येथील वंदनीय श्री वसंत महाराज संस्थान, आमनेर येथील जलालूद्दीन बाबा दर्गा, लिंग येथील श्री दादाजी धुनिवाले दरबार या तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यश आले.
वरुड तालुक्यातील या तीर्थक्षेत्र स्थळांना मिळाला ‘ब’ दर्जा !
१) लोणी येथील वंदनिय वसंतदास महाराज संस्थान,
२) आमनेर येथील सय्यद शहा जलालुद्दीन दर्गा,
३) लिंगा येथील श्री. दादाजी धुनीवाले दरबार,
वरुड तालुक्यातील प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या वंदनीय श्री वसंत महाराज संस्थान लोणी, हजरत जलालूद्दीन बाबा दर्गा आमनेर, श्री दादाजी धुनिवाले दरबार लिंगा या तिर्थक्षेत्रावर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असून या तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढल्याने येथील सोई सुविधांमध्ये वाढ होणार असल्याने भाविकांना सोई सुविधा उपलब्ध निर्माण करण्यासाठी या तिर्थक्षेत्रांना यशस्वी पाठपुरावा करून “ब” दर्जा प्राप्त करून घेतला असून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. — आमदार देवेंद्र भुयार