Home महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना ब्रिटिशासारख वागणूक देत आहे

शासन शेतकऱ्यांना ब्रिटिशासारख वागणूक देत आहे

94

🔹शेतकरी राज्याचा अंत पाहू नये अन्यथा उग्र आंदोलन उभारावा लागेल

🔸शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19नोव्हेंबर):- उपविभागातील शेतकऱ्यांनी महावीज वितरण विभागीय कार्यकारी कार्यालय पुसद येथे धडक देऊन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरुद्ध आपला संताप व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ व अतिवृष्टीने हाहाकार उडाला जिल्ह्यातील शेतकरी ओल्या दुष्काळात होरपळून निघाला कधीही न भरून निघणार शेती व शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आता समोरील सर्व आर्थिक दारोमदार व भिस्त ,ही रब्बी हंगामावर अवलंबून असताना वीज वितरण कंपनीने व ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.

आठवड्यातून केवळ ( 3 ) दिवस शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळत असते त्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून रात जागल करून कडाक्याच्या थंडीत व हिंस्र वन्यजीवांचा साप, विंचू या प्राण्यांना हल्ल्याला बळी पडून शेतकऱ्यांना शेतीला सिंचन कराव लागते अनेकदा या हल्ल्यात शेतकऱ्यांना आपला नाहक जीव गमवावा लागतो अशा कठीण परिस्थिती आज शेतकऱ्यांवर उद्भवलेली आहे यवतमाळ जिल्हा हा अभयारण्यांनी वेढलेला असल्यामुळे या यवतमाळ जिल्ह्यात विशेष बाब म्हणून घोषित करण्यात यावी व दिवसाला 12 तास वीज देण्यात यावी या प्रमुख मागणी घेऊन शेतकऱ्यांच्या शेतातील नादुरुस्त रोहित्र ट्रांसफार्मर व जळालेली केबल अन्य ट्रांसफार्मर वरील साहित्य साधन कार्यतत्वतेने बदलून देण्यात यावी बिलादुरुस्ती करण्यात यावी वीज जोडणी तातडीने देण्यात यावी दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सक्तीचे वीज बिल वसुली करण्यात येऊ नये व विना खंडित सुरळीत वीज पुरवठा 12 तास देण्यात यावा यासाठी आपला आक्रोश व्यक्त केला हे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात कार्यालयाला धडकले होते.

यावेळी मनीष भाऊ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व विभागीय कार्यकारी अभियंता यांच्याकडून गावंडे साहेब यांना सामूहिक रित्या मागणी पत्राचे निवेदन देण्यात आले व या सर्व समस्या शासनाने सकारात्मकतेने विचाराधीन घेऊन तातडीने दिलासा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून निरपेक्ष न्याय घेऊ असा गर्भित इशारा यावेळी शेतकरी नेते मनीष भाऊ यांनी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाला दिला हे निवेदन सादर करत असताना ज्येष्ठ शेतकरी नेते अविनाश भाऊ पोळकट जेनेलुद्दीन सिद्दिकी जिल्हा परिषद सदस्य , ज्ञानेश्वर भाऊ तडसे माजी सभापती , संजय भाऊ आडे , तांडा सुधार समिती शिवानंद भाऊ राठोड आशुतोष खरात , विशाल पवार , जगदीश राठोड , सचिन उबाळे शरदराव पाटील वनवारला , ज्ञानेश्वर काळे उमरखेड स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष , प्रेम राव सरगर , स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पुसद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी व सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ,

यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गावंडे साहेब यांच्याकडे कंदील सोपवून उपासात्मक प्रतिनिधी स्वरूपाचा निषेध शेतकऱ्यांनी व्यक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात कंदील मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात शेतकऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात घोषणा देऊन शासनाचा निषेध करून शेतकरी संघटनेचा व जय जवान जय किसानाचा नारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here