[जागतिक शौचालय दिवस सप्ताह]
भारतात मोठमोठ्या देवालयापेक्षा शौचालयांची अत्याधिक आवश्यकता भासत आहे. आज भारतात कित्येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते. जेंडर बजेटमध्ये लाखोंची तरतूद होऊनही कधी प्रशासनाची टाळाटाळ तर कधी वित्तीय संकटामुळे लोक शौचालय बांधत नाहीत. ही महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतासाठी दुर्दैवी बाब ती कोणती असू शकेल? संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांगडावर शौचालय बांधले होते. महाराष्ट्र संताची भूमी आहे. अनेक थोर महात्मे महाराष्ट्रात घडून गेले आहेत. त्यापैकीच एक संतश्रेष्ठ गाडगेबाबा होते. स्वच्छतेचे महत्त्व सर्वप्रथम त्यांनी समाजाला पटवून दिले. त्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील धूळ, घाण, कचरा साफ केले. ते खरे स्वच्छतादूत व स्वच्छतेचे पुजारी होते. बापू- श्रीकृष्णदास निरंकारीजींचा हा लेख जरूर वाचा… संपादक.
आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया नियोजित व अनियोजित क्षेत्रात काम करू लागल्या आहेत. मंदिरे, धार्मिक स्थळे, मार्केट, विविध वस्तू विक्रीचे रोड मार्केट, बाजार अगदी, रांगोळीपासून ते अनेकविध वस्तू विक्रीसाठी स्त्रिया घरापासून तास न् तास दूर राहतात. तेव्हा मलमूत्र विसर्जनाची गरज भागणार कशी? किती व कशी सोसायची ही हालअपेष्टा? ती मूलभूत गरजांपासून इतकी उपेक्षितच असू नये. निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांसाठी प्रसाधनगृह हेसुद्धा स्वच्छ भारत अभियानात आवर्जून समाविष्ट झाले पाहिजे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन आणि ते दाबून, कुचंबून ठेवणे, आरोग्यास किती हानीकारक? स्त्रियांचे आरोग्य व शारीरिक सुदृढता महत्त्वाची, तसेच मानसिक कुचंबणा टाळणे मोलाचे म्हणून स्त्रियांसाठी घरीदारी प्रसाधनगृहे हवीच आहेत. ती तशी सार्वत्रिक हवी. सार्वजनिक व कौटुंबिक स्तरावर प्रथम प्राधान्याने प्रसाधनगृहे उभारावीत. त्यातच शौचालय नसल्याने स्त्रियांच्या मासिक धर्माच्या काळात किती हाल होतात? ते विचारूच नका. म्हणे, आपण आता प्रगतशील अर्थव्यवस्थेच्या टप्प्यावर आहोत. प्रगत, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, विकासाचे टप्पे पार करताना स्त्री प्रसाधनगृहाचा विषय इतका गंभीर असू नये, ही थोडी थोडकीच लज्जास्पद बाब असेल का?
विश्व मलमूत्र विसर्जन व्यवस्थापन दिन- जागतिक शौचालय दिन ही नैसर्गिक गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले जाते; पण ती उघड्यावर करण्याची क्रिया नसून त्यासाठी प्रसाधनगृह हवे, हे मान्य असूनही त्याबाबत प्रचंड अशी उपेक्षा व स्त्री प्रसाधन गृहाकडे तर नको तितके दुर्लक्ष होत आहे. शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले; मात्र माणसाच्या मलमूत्र विसर्जनासाठी बंदिस्त सोय असण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शरीर जीवनशैलीची ही अविभाज्य अशी प्रक्रिया होय. तो संवेदनशील असा विषय आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे सार्वजनिक अनारोग्याला, साथीच्या रोगांना निमंत्रणच जणू काही! हा दिन मलमूत्र विसर्जनाचे व्यवस्थापन व देशापुढील आरोग्याशी निगडीत आहे. त्याबद्दलची अनास्था, उपेक्षा आणि योग्य ती दखल घेण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष, अशी स्थिती आज आपल्या समाजात विशेषतः ग्रामीण निम्नशहरी भागात आहे, हे दुर्दैव होय. १९ नोव्हेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी स्वच्छतेचे महत्त्व पटवून घ्यावे व द्यावे. नैसर्गिक गरज भागविली जावी, म्हणून या दिनाचे प्रयोजन करण्यात आले.
विश्व प्रसाधनगृह दिन हा आपल्याला आपल्या जीवनात स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याची आठवण करून देतो. आपल्या परिसरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत आणि आपण त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जागतिक शौचालय दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्यांना अस्वच्छ सांडपाणी व्यवस्थेचे विविध धोके माहित नाहीत त्यांना सांगणे आवश्यक आहे. मानवी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यातून कोणतेही आजार होऊ नयेत. मानवी कचऱ्याचे कंपोस्ट खत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कचऱ्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण होतात. या दिवसांत ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांना शौचालये आणि स्नानगृहे बांधण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. योग्य स्वच्छता व्यवस्थेशिवाय असे लाखो मार्ग आहेत, ज्याद्वारे रोग पसरू शकतात. जागतिक शौचालय दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे, की या रोगांवर कोणत्या मार्गांनी सामना केला जाऊ शकतो, यावर चर्चा करणे होय. भारतात मोठमोठ्या देवालयापेक्षा शौचालयांची अत्याधिक आवश्यकता भासत आहे. आज भारतात कित्येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते. जेंडर बजेटमध्ये लाखोंची तरतूद होऊनही कधी प्रशासनाची टाळाटाळ तर कधी वित्तीय संकटामुळे लोक शौचालय बांधत नाहीत. ही महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतासाठी दुर्दैवी बाब ती कोणती असू शकेल?
सुज्ञ पालकाने आपली लाडकी मुलगी संडास नसलेल्या घरी मुळीच देऊ नये. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांगडावर शौचालय बांधले होते. महाराष्ट्र संताची भूमी आहे. अनेक थोर महात्मे महाराष्ट्रात घडून गेले आहेत. त्यापैकीच एक संतश्रेष्ठ गाडगेबाबा होते. स्वच्छतेचे महत्त्व सर्वप्रथम त्यांनी समाजाला पटवून दिले. त्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील धूळ, घाण, कचरा साफ केले. ते खरे स्वच्छतादूत व स्वच्छतेचे पुजारी होते.
निरोगी आरोग्याचा कानमंत्र म्हणजे स्वच्छ अशा बंदिस्त संडासमध्ये मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था असणे होय. परंतु सुमारे ४० टक्के लोकांना शौचालयाची सुविधा नसणे वा त्याचा वापर न करणे अशी स्थिती आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात ११० दशलक्ष शौचालयांची गरज आहे. ग्रामीण निम्नशहरी भाग, झोपडपट्टी, जुन्या वसाहती, डोंगर भागात वाड्या-वस्त्या वगैरेमध्ये शौचालयाची उपलब्धता नाही. उघड्यावर शौचास बसणे, हाच शिरस्ता आजतागायत चालू आहे. पाणंद, ओढा, नदी, टेकडी, झाडे-झुडपे वगैरेचा आधार घेत स्त्रिया मलमूत्र विसर्जन करतात. पुरुष समोर दिसला, की उभे राहणे हेच अपरिहार्य कर्म झाले आहे. स्त्रियांसाठी शौचालय नसणे, ही अत्यंत अन्यायकारक अनारोग्यी बाब होय. शहरी भागात कॉमन शौचालयाची व्यवस्था असते, तीही अपुरी व अस्वच्छच. त्यातच स्त्रियांच्या स्वभावानुसार त्या रांगेत उभे राहण्यास टाळाटाळ करतात. शिवाय सकाळी कामाची गडबड असते. मग ही नैसर्गिक गरज कुचंबून मारली जाते. त्यात आजारग्रस्त स्त्रिया, गरोदर माता, तरुण मुली यांची तर फारच गैरसोय होत आहे. ग्रामीण परिसरांमध्ये पारंपारिक मलनिस्सारण पद्धतीकरिता होणारी मोठी भांडवली गुंतवणूक, न परवडणारी देखभाल, व्यवस्थापन खर्च, पाण्याचा अपुरा पुरवठा, विखुरलेल्या वस्त्या व गावे आदींमुळे शक्य होत नाही. शहरी भागात प्रसाधनगृहे वाढत असूनही अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे, तेही विशेषतः स्त्रियांसाठी प्रसाधनगृह उभारणीमध्ये. व्यक्तिगत आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक आत्मसन्मान रक्षण व प्रगतिशील राष्ट्र म्हणवून घेण्याच्या या टप्प्यावर तर सर्वांसाठी प्रसाधनगृहे ही अत्यावश्यक गरज मानली जावी.
स्त्री-पुरुष समानता, स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या, या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आदी या समानतेचा लढा देताना शासनावर दबाव टाकण्याचा म्हणूनच प्रयत्न करतात. त्यामध्ये वास्तविक स्त्री प्रसाधनगृहाची नितांत आवश्यकता, हा विषय प्रथम प्राधान्याने घ्यायला हवा. शिवाय जनजागृती, समाजप्रबोधन, कौटुंबिक समुपदेशन, स्त्रीपुरुष समानता विषयक कायदे आणण्याचा लढा देताना स्त्रियांचे मूळ दैनंदिन जीवन जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे मानून प्राधान्य द्यायला हवे. समानतेचा नारा देताना मुळातच स्त्री जीवन सुसह्य, सोसीक व सुखावह कसे होईल, हे पाहायला हवे. त्या दृष्टीने स्त्री प्रसाधनगृह हा प्रश्न मोलाचा आहे, याचे भान त्या चळवळीने व शासनानेसुद्धा ठेवावे, ही अपेक्षा!
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे विश्व शौचालय दिनाच्या सर्वांना अनुवर्तनास्तव आठवडाभर हार्दिक शुभेच्छाजी !!
✒️बापू;- श्रीकृष्णदास निरंकारी(श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर)मधुभाष:-७७७५०४१०८६