🔹समाधान ने संघर्ष करून यशाचे शिखर सर केले — गुलाबराव वाघ
🔸निकोप स्पर्धा ठेवली तर यशाचा गोडवा चाखता येतो — लक्ष्मणराव पाटील
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.17नोव्हेंबर):– येथील विकल्प ऑर्गनायझेशन व उबाठा सेनेतर्फे समाधान महाजन (CISF) तसेच रितेश पाटील (कनिष्ठ लिपिक) यांची निवड झाल्याबद्दल अनमोल ग्रंथ, शाल, पुष्पहार देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तिरंगा अकॅडमी चे संचालक समाधान गजानन महाजन (वाघ) यांची स्टाफ सिलेक्शन मार्फत (CISF) मध्ये तसेच सामग्री प्रबंधक सुभेदार कै. भिकन जगन्नाथ पाटील यांचे चिरंजीव रितेश भिकन पाटील याची (कनिष्ठ लिपिक, होमगार्ड समादेशक कार्यालय नंदुरबार) या दोन्ही यशवंतांचा विकल्प ऑर्गनायझेशन व उबाठा सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाधान पाटील याचा देखील वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व सत्कारार्थींना चालू घडामोडी – २०२२, राजमाता जिजाऊ, शंभूगाथा हे अनमोल ग्रंथ, शाल, पुष्पहार देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
समाधान महाजन (वाघ) अतिशय संघर्षपूर्ण परिस्थितीतून पुढे आला आहे. वयाच्या ५ व्या वर्ष पितृछत्र हरवलेल्या समाधान ने लहानपणी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत शिक्षण अविरतपणे सुरू ठेवले. स्वतःच्या मालकीचे घर, शेती काहीही नसतांना अतिशय संघर्षमय परिस्थितीतून मार्गक्रमण करणाऱ्या समाधानने जिद्द आणि चिकाटीच्या आधारे हे यश मिळवलं. ‘तिरंगा अकॅडमी’ च्या माध्यमातून आज धरणगाव शहरात स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करणारा समाधान नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले स्व. भिकन जगन्नाथ पाटील यांचा मुलगा रितेश याने देखील वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून मार्गक्रमण करावे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या वतीने लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी समाधान व रितेश दोघांनाही भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी उबाठा सेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लो.नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र ठाकरे, उपजिल्हा प्रमुख शरद माळी सर, भाजप गटनेते कैलास माळी सर, शेखर पाटील, नगरसेवक सुरेश महाजन, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा.रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, सदस्य राजेंद्र पाटील (महाले), मोहन पाटील, गणेश पाटील, आनंद पाटील, समाधान चे पाहुणे संतोष महाजन, म.फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक हेमंत माळी, साई बाबा कामगार संघटनेचे राजू महाजन, किशोर पवार सर, शिंदे गटाचे युवा नेतृत्व वाल्मिक पाटील, स्वप्निल मेडीकल चे संचालक सुधाकर वाणी, जनाई मेडिकल चे संचालक सुहास पाटील, चंदू भावसार, उबाठा सेनेचे धिरेंद्र पुरभे, गणेश महाजन, किरण अग्निहोत्री, सुदर्शन भागवत तसेच दिनेश चौधरी, हेमंत चौधरी, जगदीश मराठे, अमोल सोनार, भूषण भागवत, तेजेंद्र चौधरी, पंकज पाटील, राहुल पाटील, दादू पाटील, भूषण पाटील, गोपाळ पाटील, जयेश महाजन, सुमित महाजन, शुभम बागुल, दिपक पाटील, भूषण पाटील, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, मोहीत पाटील, समीर तडवी, प्रफुल पवार यांच्यासह उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, लहान माळी वाडा परिसरातील मित्र परिवार, तिरंगा अकॅडमी चा विद्यार्थी वर्ग, लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराचे सदस्य तसेच गावातील व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.