Home महाराष्ट्र शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण

शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण

118

भारत हा कृषिप्रधान देश होता,शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जात होता. देशात सर्वत्र सुजलम,सुपलम होते. शेतकरी,शेतमजूर अशिक्षित असुन सुद्धा इमानदार,प्रामाणिक होता.कारण त्याला शिकवण तशी दिली होती,उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करणे कमी पणाचे वाटत असे,म्हणूनच गांवात शाळा कॉलेज पेक्षा मंदिराला जास्त महत्व प्राप्त झाले होते. आज भी आहेच त्यावरच एका विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व आणि उत्पन्न अवलंबून आहे. त्याला कोणीच रोखु शकत नाही. अज्ञान अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी शिक्षण काळाची गरज होती. परंतु आजचे शिक्षण खोटे बोलून कशी फसवणूक, अडवणूक करून पैसे कमवावे हेच तत्वज्ञान सांगते.

त्यात प्रामाणिकपणा शिल्लक राहिला नाही. शिक्षण धंदा झाला आहे, आरोग्यासाठी हॉस्पिटल सेवा देणारा धंदा झाला आहे, रोजगार कंत्राटदाराचा धंदा झाला आहे. शिक्षणसंस्था,हॉस्पिटल,कंत्राटदारी सर्वच बाजुने सर्वच समाजाचे आर्थिकदृष्ट्या शोषण करणारी मजबुत यंत्रणा उभी राहिली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आशिर्वाद असल्यामुळे त्यांचे प्रशासकीय अधिकारी व त्यांची यंत्रणा कोणाचं काही वाकडं करू शकत नाही.

त्यामुळेच शिक्षणातील,आरोग्यातील,रोजगारीतील गुणवत्ता संपली आहे.शिक्षणसंस्था चालकांना पैसे फेकले की पाहिजे त्या गुणवतेचे प्रमाणपत्र मिळते.डॉक्टर झाले तर हॉस्पिटल काढून पाहिजे त्यापद्धतीने रुग्णाच्या नातलगांना आर्थिक दृष्ट्या लुटता येते.थोडया दिवसात रुग्ण पण जातो आणि पैसे पण जातो.कोणत्या डॉक्टर वर किंवा हॉस्पिटलवर कडक कारवाई झाल्याचे आठवतं का?.मोठं मोठ्या शहरात टोलेजंग इमारती टॉवर,मेट्रो स्टेशन बांधलेली दिसतात.ते बांधणारे कुशल मनुष्यबळ असलेले असंघटित कामगार कोणाला दिसले काय?.बांधणाऱ्या कंपनीचे नांव लिहले असते,पण कंत्राटदाराकडे असलेला कामगार कोण होता कुठून आला होता यांची नोंद झाली असते काय?.त्यांचे शिक्षण किती होते?.किती मार्क मिळाले होते त्यांचे प्रमाणपत्र गुणवत्ता कोणी तपासले?. शहराचा विकास दिसतो.

सर्वत सिमेंट काँक्रीटीकरण दिसते, ते करणारा असंघटित कामगार सारखा विंचवाचे बिराड पाठीवर घेऊन या साईट वरून ते साईटवर फिरत राहतो,कंत्राटदार करोडपती होत आहे.केबल टाकणारी कंपनी आणि कंत्राटदार कोणी असो कामगार आंध्रप्रदेश,तेलंंगना राज्यातील अण्णाच असतो मुंबईतील फुटपाथवर,आरे कॉलनीच्या रोडवर पाल टाकून राहतो. शिक्षण व आरोग्य यांच्याशी त्यांना काही घेणेदेणेच नाही. या असंघटित कामगारांच्या श्रमाची कोणी तुलनाच करू शकत नाही. ते जे काम करतात ते पाहून लोकं तोंड व नाक बंद करतात. त्यांची गुणवत्ता पाहणारा,मोजणार तपासणार एक ही अधिकारी, इंजिनिअर आज पर्यत जन्माला नाही.महात्मा फुले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहून ठेवले ते वाचून अंमलबजावणी करणारी यंत्रणा आज अस्तित्वात नाही.

बिल्डिंग बांधण्यासाठी जे साहित्य लागते ते विट, रेती,खडी, सिमेंट,दगड कुठून येते तिथे कोणते कामगार असतात. त्यांना कामगार म्हणून मान्यता तरी असते काय?. त्यांचे शिक्षण मार्कलिस्ट कोणी विचारत सुध्दा नाही.या कुशल मनुष्यबळाची गुणवत्ता आणि आचरण कोणाच्या लक्षात येत नाही.भारत हा कृषिप्रधान देश होता यादेशातील शेतकरी, शेतमजूर शेती काम करण्याचे कौशल्य आत्मसात लहानपणापासून करीत होता. त्याला कोणत्याही गुणवंतेचे प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती.आज शिक्षण मोठया प्रमाणात उपलब्ध आहे.शाळा कॉलेज मध्ये शिकवलेले शिक्षण प्रत्येक्ष जीवनात कुठेच उपयोगात येतांना दिसत नाही.फस्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि ८ अ,कळत नाही. ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही.ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होते.ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही.जे आजही कॉम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात.

जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही.असे उच्चशिक्षित एकीकडे मोठया संख्येने असतांना. त्या तुलनेत तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,ट्रॅफिक हवालदारची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे, निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.असंघटित अशिक्षित प्रतिष्ठित मानले जातात.

उच्चशिक्षित,उच्चपदस्थ असलेल्यांना नोकरीत असतांना जो मानसन्मान मिळतो.तो फक्त त्याच्या कार्यालयातच असतो. कार्यालयाच्या बाहेर समाजात त्यांची गुणवत्ता शून्य असते.
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडलेले विद्यार्थी ते जगायला सज्ज झालेले ते जीवनात यशस्वी झालेले असतात.जे शिक्षण माणसाला माणसाचे शोषण करण्याची प्रेरणा देते ते कसलं शिक्षण?. माणसाला माणसासारखं वागविण्याची प्रेरणा देते ते खरे शिक्षण असते.शिक्षण खुप असते पण वडीलधाऱ्यांशी कसे बोलावे ते माहिती नाही.शिक्षणाचा, नोकरीचा एवढा माज चढलेला असतो की स्थानिक रहिवाशात व समाजात वावरताना स्वतःला नेहमीच वेगळे समजणार.पैसा असला को सर्व सेवा विकत मिळतात. पण जेव्हा घरात लग्नकार्य असेल तर कोणी चालते.पण घरात कोणाचा मृत्यू झाला तेव्हा स्थानिक रहिवासी आणि समाजच लागतो.हे ते विसरतात त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कशी मोजणार?.मार्कशीट पाहून की आचरण पाहून?.थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक आचरणानाच्या शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही.प्रत्येक माणसांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.

मी नेहमीच वेगवेगळ्या विषयावर लिहतो. लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येतात.त्यात उच्चशिक्षित आणि अशिक्षित असंघटित शेतकरी,शेतमजूर असतात.काही उच्चप्रतीची प्रतिक्रिया व्यक्त करतात.तुम्ही खुप छान लिहले,सांगितले त्याला ते पटलं की तो म्हणतो तुम्ही अगदी माझ्या मनातील लिहल,हे बोलायला लिहायला मला योग्य शब्द सापडत नव्हते एवढंच.आणि त्यातूनच एक वेगळी मैत्री सुरू होते.तुम्ही प्राध्यापक आहात काय?.कुठे नोकरी करता?.वय किती?. मुलं किती?. काय करतात?. जात,धर्म,जिल्हा सर्वच आपोआप येते.मैत्रीपूर्ण सबंध निर्माण होतात,त्यातुन जिव्हाळा तयार होतो. शिक्षणातील मार्कलिस्ट पाहून नोकरी मिळते.पण समाजातील आचरणातुन स्थानिक पातळीवर व समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येक माणसांनी समाजाप्रती आचरणातून गुणवत्ता दाखवावी.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई)मो:-9920403859

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here