Home महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नातेपुते आयडियल स्पोर्ट्स क्लबचे उत्तुंग यश

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नातेपुते आयडियल स्पोर्ट्स क्लबचे उत्तुंग यश

110

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.16नोव्हेंबर):-देहु,पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सवाते,कराटे स्पर्धा व निवड चाचणी 2022 घेण्यात आली यामध्ये आयडियल स्पोर्ट्स क्लब नातेपुते,ता.माळशिरस,जि. सोलापूर या क्लबच्या विध्यार्थ्यानी आपले कराटेतील कलाविष्कार दाखवीत उत्तुंग यश संपादन केले.या यशामध्ये गोल्ड मेडल अभिनव राठोड,श्रीतेज शेंडगे,सुश्मिता गावडे,शाशवंत गांधी,प्रतीक्षा देशमुख,सिल्वर मेडल तन्मय पालवे,चैतन्य पांडुले,प्रतीक्षा गोफने,आर्यन कुंभार,स्नेहा कोरटकर,ब्राँझ मेडल पुळकोटी, ता.माण,जि. सातारा गावचे सुपुत्र राज अरविंद बनसोडे,ओंकार राऊत,हर्षद काळे,लिशा राऊत,ऋतुजा लोंढे,समर्थ जाधव यांनी पटकावले.

यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विध्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेतील सर्व यशस्वी विध्यार्थ्याना मार्गदर्शक शिक्षक सतीश राऊत,सर्जेराव पोतलकर,नितीन सोरटे,रझाक आतार आणि त्याच्या आई आणि वडील यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेतील सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे त्याच्या शाळेतील प्राचार्य, शिक्षक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here