Home चंद्रपूर भगवान बिरसा मुंडाजीं अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत्र – विवेक बोढे

भगवान बिरसा मुंडाजीं अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत्र – विवेक बोढे

109

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16नोव्हेंबर):-घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला. आदिवासी समाजाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडाजींच्या जयंतीनिमित्त मि कोटी कोटी नमन करतो.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, निरीक्षण तांड्रा, आदिवासी समाजाचे मंदेश्वर पेंदोर, प्रकाश उईके, करण तांदुलकर, गणेश तुराणकर, कवडू मडावी, मनोहर गेडाम, अरुण भगत, गणेश खुटेमाटे, हेमंत कुमार, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here