Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल मध्ये ” शिक्षकेतर कर्मचारी गौरव दिवस ” उत्साहात साजरा...

महात्मा फुले हायस्कूल मध्ये ” शिक्षकेतर कर्मचारी गौरव दिवस ” उत्साहात साजरा !

214

🔹मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.डी.बोरसे यांचा शाल – पुष्पगुच्छ देऊन सन्मान !…..

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.15नोव्हेंबर):- धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेमध्ये “शिक्षकेतर कर्मचारी गौरव दिवस ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार सर होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.डी.बोरसे होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.डी.बोरसे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ लिपिक – जे.एस.महाजन, कनिष्ठ लिपिक – पी.डी.बडगुजर, ग्रंथपाल – गोपाल पंढरीनाथ महाजन, सेवक – जीवन दौलत भोई, अशोक निळकंठ पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.डी.बोरसे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानाचे हे पहिले वर्ष आहे. हे आमच्या कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षकेतर कर्मचारी शाळेचा मुख्य भाग असतो. कार्यालयीन कामकाज, शाळेची स्वच्छता हे सर्व या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते आणि त्यांचा सन्मान होणे हे अतिशय प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन बोरसे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक करून शिक्षकेतर कर्मचारी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील यांनी तर आभार एच.डी. माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here