Home पुणे नि:शुल्क राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेला १० डिसेंबर पर्यंत अंक पाठविण्याचे आवाहान

नि:शुल्क राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेला १० डिसेंबर पर्यंत अंक पाठविण्याचे आवाहान

122

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.15नोव्हेंबर):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी,पुणे३९ वतीने दरवर्षीप्रमाणे या १७ व्या वर्षीही राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हि दिवाळी अंक स्पर्धा प्रतिष्ठेची असुन ती नि:शुल्क आहे.साहित्यक्षेञात दिवाळी अंक मोठे कार्य पारपाडत असतात.दिवाळी अंकाला अनेक वर्षांची परंपरा आहे.अनेक संपादक मेहतीने दिवाळी अंक काढत असतात.त्यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केले जाते.विजेत्यांना भव्य समारंभपूर्वक गौरविण्यात येते.

संपादकानी आपल्या या वर्षी प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती या स्पर्धेला पाठविण्याचे आवाहान नक्षञाचं देणं काव्यमंचचे संस्थापक-राष्टीय अध्यक्ष कवी वादळकार यांनी केलेले आहे.

स्पर्धेसाठी दिवाळी अंक १० डिसेंबर पर्यत पाठवावे.
पाठविण्याचा पत्ता-
प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे
राष्टीय अध्यक्ष
नक्षञाचं देणं काव्यमंच
साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस,pcmt चौक,भोसरी,
भोसरी,पुणे -४११०३९
वर पाठवावे.असे संस्थेच्यावतीने आवाहान करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here