🔹पुरस्काराने नक्कीच प्रेरणा व ऊर्जा मिळते; श्री.खान
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.15नोव्हेंबर):- आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव २०२२’ हा पुरस्कार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा फुलेनगर, पाळधी ता. धरणगाव येथील शाळेत अध्यापनाचे कार्य करत असणारे शिक्षक मोहसीन खान अजीज खान यांना दि. १३ नोव्हे, रविवार रोजी प्रदान करण्यात आला. मोहसिन खान यांनी प्राथमिक शाळेत २००९ मध्ये आपल्या अध्यापण कार्याला सुरूवात केली होती. अध्यापनासोबत ते निरंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहीले आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.
म्हणूनच खान यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदिलशाह फारुकी संस्थेकडून डॉ. करीम सालार, मनियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, मुफ्ती हारून नदवी, मजीद जकरिया, संजीवकुमार सोनवणे, फारुख पटेल, जावेद सर, व संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह आदी मान्यवरांच्या शुभहस्ते श्री. खान यांना जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. खान यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, संस्थाध्यक्ष फारुख शाह, मुख्याध्यापक तन्वीर शाह, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंकडून अभिनंदन केले जात आहे.