✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.15नोव्हेंबर):- भगवतीदेवी विद्यालय, देवसरीच्या भव्य निसर्गमय प्रांगणात अशोक वृक्षाच्या छायेखाली राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा संविधान व परिपाठ झाल्याबरोबर बिरसामुंडा जयंतीला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत यशवंतराव कबले तर प्रमुख अतिथी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिनेश वानरे यांनी प्रथमता बिरसा मुंडाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
तर या कार्यक्रमात प्रथमतः मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अतिशय बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष यांनी अतिशय मौलीक विचार व्यक्त केले. त्याचबरोबर शिक्षक व विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमास दिगंबर माने शेख सत्तार राजेश सुरोशे गणेश शिंदे सौ. मीनाताई कदम पांडुरंग शिरफुले मारुती महाराज अरविंद चेपुरवार यांची उपस्थिती होती.