Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

89

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.14नोव्हेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू अभ्यास व संशोधन केंद्र तसेच इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ नोव्हेंबर ‘पंडित जवाहरलाल नेहरू जयंती’ व ‘बालदिना’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, प्रमुख वक्ते म्हणून ग्रंथपाल डॉ.व्ही. आर. कांबळे आदि उपस्थित होते. याप्रसंगी आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख सौ. एस.बी.पाटील यांनी प्रास्ताविक करतांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा परिचय करून दिला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. व्ही.आर.कांबळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे सामाजिक, राजकीय, व्यापारी दृष्टिकोन सविस्तरपणे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन स्पष्ट केले तसेच राजकीय क्षेत्रातील पंडित नेहरू यांच्या गौरवशाली कार्याचा परिचय करून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आर.आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here