


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.9जून):- अधिक मासानिमित्त घुटकाला येथील विठ्ठल रुक्माई मंदिर येथे भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने हरिनामाच्या गजरात अधिक मास पोथी वाचनाचा कार्यक्रम कथावाचक सौ अश्विनी दाणी यांनी सादर केला. वाचनापूर्वी हिंगुलांबिंका मातेची आरती करण्यात आली अश्विनी दाणी, योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर,
प्रीती लखदिवे, वैशाली भागवत, मनीषा भाके आदि महिला उपस्थित होत्या.
हिंदू पंचांगानुसार अधिक मास तीन वर्षानंतर येतो याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा मास भगवान विष्णूला समर्पित मानला जातो श्रीमद् भागवत महापुराणात या महिन्याचे विशेष महात्म्य वर्णिले गेलेले आहे व यात जप, तप, दान, व्रत, पोथी वाचन कीर्तन, भजन आणि सत्संग केले जातात. या काळात केलेले पुण्यकर्म इतर महिन्यापेक्षा अधिक फलदायी मानले जाते अधिक मास हा केवळ धार्मिक विधीचा महिना नसून आत्मपरीक्षण, सदाचार संयम सेवा आणि ईश्वरभक्ती वाढविण्यास हा काळ योग्य मानला जातो.
या काळात समाज बांधवांनी सदाचार, सदवर्तन दान सेवेच्या माध्यमातून आत्मोन्नतीचा मार्ग साधल्या जाऊ शकतो अधिकमासाचे महत्त्व वाचनाच्या माध्यमातून समाजापर्यंत अश्विनीताई दानी यांनी अगदी सहज आणि सोप्या शब्दांमध्ये मांडणी केली. यामुळे वार्डात धार्मिक, भक्ती भाव पूर्ण चैतन्यमय वातावरणाची निर्मिती झाली. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वार्डातील सर्व सुज्ञ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.















