कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याची परिस्थिती पहाता कवी, लेखक, साहित्यिकांनी निर्भय होऊन लिहिणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले ते सतेज काव्य मंच आयोजित भव्य काव्य संमेलनात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
तत्पूर्वी आमदार सतेज पाटील लिखित, राजकारणाचा खेळ झाला, सत्तेचा प्याद नाचल, सर्वसामान्यांचे स्वप्न, वाचण्यात हरवलं! या कवितेच्या ओळी लिहून ॲड. डॉ. रमेश विवेकी यांच्या हस्ते काव्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उदघाटक ॲड. डॉ. रमेश विवेकी म्हणाले, कवी व कविता गंभीर असते. कविता दिशादर्शक असते. कवी जग बदलण्याची क्षमता बाळगतो. त्यांनी सर्व सामान्य माणसाला न्याय देणारी भूमिका आपल्या कवितेत शब्दबद्ध करावी.
यावेळी डॉ. सतीशकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील 151 कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
आमदार प्रा. जयंत आसगावकर, ॲड. कृष्णा पाटील, अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, अनिता काळे, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी निर्मिती प्रकाशन, प्रकाशित सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲड. कृष्णा पाटील, लिखित कोर्टाच्या पायरीवरून या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचा प्रकाशन झाले. ॲड. डॉ. रमेश विवेकी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर काव्य संमेलनात संघसेन जगतकर, रंजना सानप, कवी सरकार, निशा खरात, स्वाती कोरगावकर, लता माने, प्रथमेश माने, युवराज पाटील, सविता कुलकर्णी, शरद गुरव, भार्गवी कुलकर्णी, माधव खलाणेकर, रघुनाथ कापसे, प्रियांका पाटील, दत्तात्रय पाटील, नवरत्न बिलावर, कौसत मंगेश रावळ, राजकुमार कीर्दत, संजय कांबळे, विजयकुमार पोवार, सय्यद वासीयोद्दीन, विमलताई माळी, त्रिशला शहा, निवृत्ती मसवेकर, अनुपमा ढमाळ, दिनेश चोरगे, शांतिनाथ पाटील, दिप्ती कुलकर्णी, पुरुषोत्तम निकाते, सुवर्णा पवार, प्रतिभा जाधव, दत्ता वालेकर, मिलिंद कुलकर्णी, मनोज नेरकर, दादासाहेब सादोळकर, मेघा माने, साताप्पा सुतार, सुनील जाधव, शेजल गावडे, गोविंद पाठक, राहुल राजापुरे, शीला कसबे, राजेंद्र करनुरकर, संजय पातुरकर, प्रताप घेवडे, भगवंत फडणीस, सीमा असवेकर, शाम करंजकर, अमर गायकवाड, अमिता शहा, नंदिनी चांदवले, परशुराम कांबळे, रामचंद्र कांबळे, मनोहर पाटील, सुष्मिता रेंदाळकर, उज्वला जाधव, वैशाली वर्तक, कमल आठवले, मोहिद्दीन नदाफ, उर्मिला शाह, आकाश जाधव, बंडू खोत, सुनील जाधव, वसुधा कुरणे, नितीन पवार, माणिक नागावे, अंजली देशपांडे, सौरभ बांदेकर, आरती मांढरे, नामदेव हुले, राजेंद्र कुरणे, माधुरी पंडित, रवींद्र भोसले, गौतम वाघमारे, अस्मिता इनामदार, सदाशिव कांबळे, विठ्ठल जावळे, विनायक पाटील, अशोक मोहिते, मधुकर हुजरे, बाबासाहेब कांबळे, वर्षा कांबळे, तनुजा भिडे, श्रुती माने, प्रतिभा बामणे, विद्या खामकर, वसुंधरा निकम, मनिषा नाडगौडा, रोशनी हुंद्रे, विजय ताटे, जयश्री खिस्ती, रावण समुद्रे, उषा कोल्हे, सुहासिनी शेळके, शोभा आव्हाड, रोहिणी पराडकर, शिवाजी पाटील, मारोतीराव नाईक, संचित कांबळे, सविता माने, अंकिता कांबळे, योगिनी खाजेकर, संतोष राऊत, मिथुन गायकवाड, राजश्री दळवी, सुरेखा काळे, अजित राजपूत, अशोक कांबळे, महनंदा गुणकी, प्रियांका मोरे, सुमनताई मनवर, विद्रोही पि. के., किरण करंदीकर, दत्तात्रय ठुबे, बंडू खोत, निशा खरात, प्रसाद कुटे, विजय कदम, समद शेख, संगिता कानिंदे, शैलजा परमणे, कविता बिरारी, समृद्धी पाटील, सोमनाथ बंड, प्रकाश मुळे, स्वानंद कुलकर्णी, सुनिता पाटील, प्रतीम जाधव, प्रविण रायबागकर, राहुल आसुर्लेकर-पाटील, विशाल सुतार, संतू पाटील, संजय मोरे, किरण करंदीकर, दत्तात्रय ठुबे, आलिशा नदाफ, अमोल कांबळे, अनिकेत तोडकर, अनुजा कांबळे, आशिष सातपुते, अस्मिता आळतेकर, देविदास भोयर, मनिषा जाधव, विनायक यादव, अनिता भोसले, प्रमिला कुलकर्णी, प्रेमा मेणशी, आनंद मेणशी, शांताबाई सोनोने, मुकुंद दखने, विजया देशपांडे आदी मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर, अभिजीत मासुर्लीकर यांनी केले.
संपर्क
9823949559
