
चंद्रपूर – जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होऊ घातलेले आहेत. त्यात वींसी कंपनीतर्फे प्रोफाइल अपडेट करण्याचं काम जिल्हा परिषद आणि कंपनी मार्फत केल्या जात आहे. शिक्षकांना बदली प्रोफाइल उपलब्ध करून दिल्यानंतर शिक्षकांनी नोंदविलेले नोंदी सर्विस बुक नुसार करंट स्कूल जॉइनिंग डेट आणि करंट एरिया जॉइनिंग डेट तपासून खात्री करण्याचे काम संबंधीत गटशिक्षणाधिकारी यांचे होते मात्र तसे न करता काही गटशिक्षणाधिकारी यांनी सेवापुस्तकाचा आधार घेऊन माहिती अपडेट केली मात्र काही गटशिक्षणाधिकारी यांनी चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे जवळपास अर्ध्या-अधिक शिक्षकांच्या करंट एरिया जॉइनिंग डेट व स्कूल जॉइनिंग डेट सारख्याच झालेले आहेत त्यामुळे काही शिक्षक बदलीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत तर काही शिक्षक बदलीतून सुटणार आहेत त्यामुळे प्रामाणिकपणे माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे आणि हे सगळं अधिकाऱ्याच्या मिली भगत मुळे चुकीच्या तारखा टाकल्या गेल्या अशी कुजबूज शिक्षकांमध्ये सुरू आहे त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करून त्वरित शिक्षकांच्या प्रोफाईल दुरुस्ती करावी अशी चंद्रपूर जिल्हा प्राथमिक मध्यवर्ती संघटना व शिक्षकवर्ग मागणी करीत आहेत.
