चंद्रपूर (प्रतिनिधी) सामाजिक क्रांतीचे जनक आणि आपल्या समतावादी विचारांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध जोरदार लढा देणारे, बहुजन समाजाला जागृत करून त्यांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे थोर सत्यशोधक राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त स्थानिक आझाद बगीचातील ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला 11 एप्रिल 2025 ला विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . त्यानंतर एका अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे हे होते.या अभिवादन सभेत बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे,सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय सचिव किशोर पोतनवार, सत्यशोधक समाजाचे एड.हिराचंद बोरकुटे,सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे नरेन गेडाम, वंचित बहुजन आघाडीच्या तनूजा रायपुरे, संयुक्त महीला मुक्ती आघाडीच्या यशोधरा पोतनवार, माळी समाज संघटनेचे एड.सोनोने, कम्युनिस्ट चळवळीचे सुब्रतो दत्ता, डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याशनल इंजिनिअर असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हा सचिव किशोर सवाने, थेंब गृपचे एड.राजेश वनकर इत्यादी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.याप्रसंगी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संघटक भास्कर मून, भास्कर सपाट, भाऊराव मानकर , इंजिनिअर एल.व्ही.घागी,, रमेश पराते,गोपी मित्रा, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदीप अडकीने, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्हा संघटन सचिव नवनाथ देरकर, चंद्रपूर शहर कोषाध्यक्ष दिपक जुमडे,संघटक आर.टी.चिकाटे, आनंद वनकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक हेमंत शेंडे यांनी केले
