Home विदर्भ सोशल मिडीयावर विशेष लक्ष असु द्या – ठाणेदार एम. पी. आचरेकर ...

सोशल मिडीयावर विशेष लक्ष असु द्या – ठाणेदार एम. पी. आचरेकर सायबर क्राईम सुरक्षा बाबद साकोली व्यापारींची विशेष बैठक

111

 

साकोली : “आज सोशल मिडीयावर एवढ्या वेगाने विविध घटना जनतेसमोर काही क्षणातच येतात. यात काही सायबर क्राईम बाबद प्रलोभने, आँनलाईन फसवणुक असे अनेक फसवे जाहिराती येतात. तर आपण आणि आपल्या मित्रांनाही कळवा की, याकरीता सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवून अश्या फसवणूकीपासून सावध राहा, आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा” असे आवाहन साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी ( गुरू. १० एप्रिल ) ला पोलीस ठाणे सभागृहात घेतलेल्या व्यापारी बंधूंच्या बैठकीत प्रतिपादन केले.
सायबर क्राईम समंधीत आँनलाईन फसवणुकीपासून सावधान या जनजागृती करीता पोलीस ठाणे येथे साकोली शहरातील व्यापारी बंधूंची बैठक पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. प्रसंगी बैठकीत ठाणेदार आचरेकर यांनी सांगितले की, सध्या आँनलाईन खंडणी मागणे, क्यु आर कोड फसवणूक, बोगस बॅंक अधिकारी सांगत ओटीपी मिळविणे, लॉटरी लागली, आयपीएल मध्ये बक्षीस लागले, म्हणून बॅंक खाते क्रमांक मागून पासवर्ड माहिती करणे, शासकीय महिलांच्या तोतया योजना अधिकारी सांगून पैशे उकळणे अश्या अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तोतया बोगस व्यक्तींपासून सावध रहावे. व्यापारी बंधूंना अनोळखी फोनवर खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत असेल तर तात्काळ पोलीस ठाणे हेल्पलाईन ०७१८६२३६१३३ वर संपर्क साधावा. आपण सर्व ९०% व्यापारी बंधू आज सोशल मिडीयाचा वापर करता. आपणांस अश्या गुन्हेगारी क्षेत्रातील विविध प्रलोभने, बोगस शासकीय जाहिराती व पैशे आँनलाईन टाकण्याचे पोस्ट अथवा मॅसेजेस दिसल्यास कृपया कुणी गोरगरीब व सामान्य माणूस यात आर्थिक फसवणूक होऊन त्याचे नुकसान होऊ नये करीता अश्या पोस्ट वर विशेष लक्ष ठेवून तातडीने पोलीसांना याची माहिती देऊन जनतेसाठी सहकार्य करा असे आवाहन पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी केले.
सदर “सायबर क्राईम सोशल मिडीया” जनजागृती बैठकीला शहरातील किराणा, जनरल, कापड, भाजी विक्रेते यांसह सर्व लहान मोठे दूकानदार या बैठकीत हजर झाले होते. पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी याप्रसंगी आलेल्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकारांना सांगितले की, सदर सायबर क्राईम बाबद जनतेत, व्यापारी वर्गाला, युवा विद्यार्थ्यांना, महिलांना, शासकीय कर्मचाऱ्यांना यांची जलदगतीने माहिती व प्रसार व्हावा यासाठी सोशल नेटवर्किंग मिडीया व वृत्तपत्रांतून ही जनजागृती करण्यासाठी येथील पत्रकारांनी सहकार्य करावे असे सुद्धा आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here