
अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.30मार्च):-“प्रा.बनसोड यांनी “राष्ट्रमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य व सन्मान सावित्रीच्या लेकींचा” या पुस्तकात सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य सुबोध भाषेत सांगितल्यामुळे ते वाचकांच्या मनाला स्पर्शून जाते.त्यांना अपेक्षित असलेला समाज आणि राष्ट्र निर्माण होण्यासाठी फुले दाम्पत्यांच्या क्रांतिकार्याच्या आचरणाची आज गरज आहे, प्रा.बनसोड यांचे हे पुस्तक समाज परिवर्तन घडविणारे आहे.”असे विचार प्रमुख अतिथी प्राचार्या डॉ.कमलताई गवई (माजी लेडी गव्हर्नर) यांनी व्यक्त केले .
त्या सुधीर प्रकाशन,वर्धा व वऱ्हाड विकास,अमरावती तर्फे समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित ‘राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य आणि सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात विचार व्यक्त करीत होत्या.
दि.२६ मार्च २०२५ ला पोदार इंटरनॅशनल स्कूल, अमरावती येथे थाटात संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य सुधीर महाजन तर प्रमुख अतिथी प्राचार्या डॉ.कमलताई गवई (माजी लेडी गव्हर्नर ), डॉ.गणेश खारकर, डॉ.मेघना वासनकर-बगडे, अपर्णा यावलकर -डांगोरे,समीक्षक व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले, स्मिताताई सं. घाटोळ ,डॉ.
उज्ज्वला सु. मेहरे,ओमप्रकाश आंबाडकर, नाट्यकर्मी प्रा.पी. जी.भामोदे,रजनी आमले होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी समारंभाचे उद्घाटन केले.
पाहुण्यांचे स्वागत व सत्कार प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी केला.
स्वागतगीताचे गायन सुमधुर आवाजात पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील रोशनी दर्जी मॅडमनी करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.प्रा.अरुण बुंदेले यांनी महात्मा फुलेंच्या अखंडांचे व
” सावित्री मशाल ” या स्वरचित अभंगाचे गायन केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य सुधीर महाजन यांनी,” राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य आणि सन्मान सावित्रीच्या लेकींचा” या पुस्तकामधून समाजभूष्ण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, वैदयकीय व उद्योग व्यवसायात यश संपादन केलेल्या महिलांना यथोचित न्याय दिल्याचे सांगून फुले दाम्पत्यांचे क्रांतिकार्य या पुस्तकातून घराघरात पोहोचणार आहे.” असे विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक भाषणात प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ” फुले दाम्पत्य हे थोर समाज क्रांतिकारक आहेत राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य व सन्मान सावित्रीच्या लेकींचा” या पुस्तकाची निर्मितीच या विचारामुळे झालेली आहे. माझे हे पुस्तक तयार करण्यामध्ये ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे सर्वांना मी आभार मानतो.”
या पुस्तकाचे समीक्षक प्रा. अरुण बा. बुंदेले (साहित्यिक ) यांनी प्रस्तुत पुस्तकाचे समीक्षणपर भाषण देताना,” महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य या पुस्तकामुळे घराघरात पोहोचणार आहे.या पुस्तकातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६८ सावित्रींच्या लेकींचा दिलेले परिचयरुपी कार्य हे सामान्य वाचक स्त्रियांना प्रेरणादायी ठरणार आहे असे हे पुस्तक संग्राहय आहे .”असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मेघना वासनकर बगडे, अपर्णा यावलकर डांगोरे, डॉ.गणेश खारकर आदिनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांना माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी “अमरावतीचे वन वैभव “हे कॉफी टेबल बुक सस्नेह भेट दिले .
पुस्तक लेखनाबद्दल प्रा. श्रीकृष्ण बनसोड व सौ.नंदा श्रीकृष्ण बनसोड यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला.
याप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य सुधीर महाजन सरांचा वऱ्हाड विकास व सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध परिवाराच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, फुले दांपत्यांचा फोटो व सन्मानपत्र प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“मी जोतीबा फुले बोलतोय “या एकपात्री नाट्यप्रयोगाचे नाट्यकर्मी प्रा.पी.जी.भामोदे यांनी सन्मानपत्राचे वाचन करून फुले दांपत्यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
डॉ.उज्ज्वला सुरेश मेहरे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. तर आभार रजनी आमले यांनी मानले .
उपस्थित मान्यवरांमध्ये ओमप्रकाश अंबाडकर, इंजि.भरतराव खासबागे, सुरेशराव मेहरे,मधुकरराव आखरे, रामकुमार खैरे,गोविंदराव फसाटे, वसंतराव भडके,सुधीर घुमटकर, पोलीस पाटील सौ.कविता नरेंद्र पाचघरे, प्रा.शारदा अ. गणोरकर, सुनिता मनोज भेले, वंदना मडघे, कीर्ती म्हसकर ,सुरेशराव मेहरे, डी.एस.यावतकर,प्रा.डॉ.मनीषा शाम काळे, डॉ.निलिमा उमप, डॉ. शिल्पा गहूकर,निलिमा पाटील, राजूभाऊ भेले,अरुणा खारकर, अरुण गणोरकर, जयकुमार चर्जन, विद्या यावलकर, हिरालाल चांदुरकर, शीला सर्जन, शीतल राऊत, स्मिता हुसे, पत्रकार अनुप गाडगे, संगीता गोरडे यांच्यासह फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील अनेकांची उपस्थिती होती.
