रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.26मार्च):- दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र विठोबा विखार यांच्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे सर, अधिष्ठाता डॉ. विना चिमोटे, मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण साळोक, सुप्रसिद्ध विचारवंत व समाजशास्त्रज्ञ डॉ.सुरेश वाघमारे, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बि.एम.कराडे, गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.बि. एच.किर्दक ,रातुम विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मेश्राम , डॉ. के.बि.नायक,डॉ.किशोर राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
डॉ.रवींद्र विखार यांचे सात पुस्तके प्रकाशित झाले असून बि.ए. प्रथम वर्षाला’ समाजशास्त्र परिचय’ या पुस्तकाचा गोंडवाना विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. सामान्य संशोधन पद्धती भाग एक व भाग दोन क्रमिक पुस्तक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
डॉ. रवींद्र विखार हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुण्याचे सदस्य असून विदर्भ मराठी समाज समाजशास्त्र परिषदेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत .त्यांची 60 हून अधिक संशोधन पेपर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात झालेले आहेत.
त्यांचे अभिनंदन दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे ,संस्थेच सन्माननीय पदाधिकारी ,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले आहे.
