रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.20मार्च):- राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा प्रो. बबनराव डोहे (यवतमाळ) स्मृती गुणवंत विद्यार्थी पुरस्काराचे वितरण नुकतेच सांगडी (तेलंगण स्टेट) येथे संपन्न झालेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात चार गुणवंत विद्यार्थांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व रोख रक्कम होते.
सदर पुरस्कार आदिलाबाद जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुहासिनी रेड्डी चिट्टाला यांच्या हस्ते -कु. माेक्शा सामावार,कु. तृप्ती मालेकर ,श्री सूरीदास अड्डीकवार,श्री. वेदन नवघरे या चार गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे, डॉ. पदवाड, संमेलन समितीचे संजय तिळसमृतकर , शिवाजी भेदोडकर, श्रीकांत धोटे आदी उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे संयोजन समितीचे भाऊराव बोबडे (राजुरा), डॉ . दिनेश डोहे (यवतमाळ) , इंजि. विलास उगे, विलास चौधरी, संजिव पोडे, नामदेव गेडकर, भूमा रेड्डी आदींनी अभिनंदन केले आहे.
