
अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गगाखेड(दि.9मार्च):-शहरातील सर्वात जुन्या नामांकित आशा संत जनाबाई महाविद्यालयात डॉक्टरेट मिळवलेले महाविद्यालयीन उपप्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकात यांच्यात फ्रिस्टाईल हाणामारी झाली.ही हाणामारी महाविद्यालयाच्या आवारात उपाहार गृहाच्या परिसरात हा प्रकार घडलाअसून, सोबतच्या प्राध्यापकांनी धराधरी केल्याने पुढील प्रसंग टळला. कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून झालेल्या या हाणामारीची जोरदार चर्चा संपूर्ण गंगाखेड शहरात सुरू आहे.
संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिक्षण आणि शिस्तीसाठी सुपरिचित आहे. पण याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांकडूनच विपरीत घडले. उपप्राचार्य प्रा. डॉ. दयानंद उजळंबे काल दि. ५ मार्च आपल्या काही सहकारी प्राध्यापकांसह चहापान करत बसलेले होते. यावेळच्या चर्चेदरम्यान त्यांचा वनस्पती शास्त्र बॉटनी विषयाचे प्रा. डॉ. आर जी लड्डा यांच्याशी एका विषयावरून शाब्दिक वाद झाला. बोलता बोलता हा वाद इतका विकोपाला गेला की डॉ. लड्डा आणि डॉ. उजळंबे यांच्यात मारहाणी त रूपांतर झाले. सोबत असलेल्या ईतर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. परंतू तो पर्यंत बघ्यांची गर्दी जमा होवून मुख्य रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.
या हाणामारीचा व्हीडीओही उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रीत केला असून आज तो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे महाविद्यालय व शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरील उपप्राचार्य हे संस्था अध्यक्षांचे जावई आहेत. तर वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक हे प्राचार्यांचे दुरचे नातेवाईक असल्याचे कळते. यामुळे या दोघांवर काही कार्यवाही होते की नाही, याकडे शिक्षण क्षेत्रासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.
