Home गडचिरोली खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून रेल्वे कामाचा आढावा ; तातडीने काम पूर्ण...

खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून रेल्वे कामाचा आढावा ; तातडीने काम पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.21फेब्रुवारी):-गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शासकीय विश्राम भवन गडचिरोली येथे रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वडसा -गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेतले. व लवकरात लवकर काम पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान रेल्वेचे काम करतांना कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा त्याच्या शेतातील पिकाचे नुकसान होणार नाही या संदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना देखील खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या सोबतच गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीतून नागभीड परीक्षेत्रात रेल्वे विभागाच्या उपलब्ध जागेवर रेल्वे चे नवीन काही प्रकल्प सुरु करता येईल का? या संदर्भात प्रस्ताव देखील तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. किरसान यांनी दिल्या.

या *बैठकीस खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,*  उप मुख्य अभियंता रेल्वे अरविंद विश्व्कर्मा, कार्यकारी अभियंता रेल्वे गोपीधन गिधोरा, रेल्वे इंजिनियर आर. पी. सिंग सह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here