✒️संजय बागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-9168986378
नागभीड(दि.13जानेवारी):-गेल्या सात वर्षापासून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपुलकी फाउंडेशन नागभीड च्या वतीने भिकेश्वर येथे पंचायत समिती नागभीडच्या वतीने नागभीड व मांगली केंद्राचा बिट स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 10 व 11 जानेवारी या दोन दिवशी संपन्न झाला. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे यजमान पद दोन शिक्षिका असलेल्या व 34 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिकेश्वर ने स्वीकारले होते. यात दोन्ही नागभीड व मांगली केंद्रातील 22 शाळेतील 700 पेक्षा जास्त विद्यार्थी व 70 शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते.
या निमित्ताने या सर्व महोत्सवात खारीचा वाटा उचलता यावा यासाठी आपुलकी फाउंडेशन नागभीड च्या वतीने विद्यार्थ्यांच्या नाश्त्याची सोय करण्यात आली. यावेळी आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बंडावार, संचालिका नंदा राखडे मॅडम, माया सहारे मॅडम, संचालक मधू डोईजड, महेश ठाकरे, नरेश ठाकरे, राजू ठाकरे, किशोर मुळे, पवन नागरे, स्वप्नील नवघडे, सचिन वाकुडकर, सतीश जिवतोडे, पराग भानारकर, मुकेश लांजेवार यांची उपस्थिती होती.
आपुलकी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे नागभीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे, नागभीड केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर करंभे, मांगली केंद्राचे केंद्रप्रमुख सोपान सातपुते, सर्व शिक्षक व भिकेश्वर वासिय गावकऱ्यांनी अभिनंदन केले.