✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.12जानेवारी):- वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता येणाऱ्या काळात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपघात होऊच नये यासाठी वाहक, चालक तसेच प्रवाशी यांच्यात जाणीव जागृती निर्माण होण्याकरिता तसेच वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी नियमाचे काटेकोर पालन व्हावे स्वतःची आणि इतरांची सुरक्षा कशी करता येईल यासाठी आज दिनांक 11 जानेवारीला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन सोहळा ब्रम्हपुरी आगारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या हस्ते द्वीप प्रजलन करून करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार प्रशांत डांगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले, चंदनकर साहेब,वाहतूक निरीक्षक पांडव , लेखाकार फाये, प्रभाकर वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयकुमार इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन वामन नागोसे तर आभार प्रदर्शन बोरकर यांत्रिक यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये चालक वाहकांना सुरक्षित चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रमास ब्रम्हपुरी आगारातील वाहक ,चालक तसेच यांत्रिक ,मेकॅनिक आदी कर्मचारी उपस्थित होते.