✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.8जानेवारी):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील सिपेट सभागृहात तालुक्यातील शासकीय तथा खाजगी औ. प्र.संस्था, एमसीवीसी कॉलेज व तंत्र माध्यमिक शाळा आदी संस्थांचे तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. परीक्षक म्हणून प्रा. मद्दीवार, कु. प्रा. प्रणाली हेपट, प्रा. एम.जे.शेख, प्रा.पवन रामटेके, समिती प्रमुख गटनिदेशक एन.एन. गेडकर , उपसमिती प्रमुख बी.आर. बोढेकर, गटनिदेशक हितेश नंदेश्वर, सौ. सुचिता झाडे,सौ. निमसरकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी भैय्याजी येरमे म्हणाले की, शासनाच्या स्टार्ट अप योजनेत सर्वात जास्त सहभागी होणारे आय. टी. आय. चे विद्यार्थी असतात. प्राचार्य वानखेडे म्हणाले की, तंत्र प्रदर्शनीमुळे प्रशिक्षणार्थांच्या सुप्त गुणांना चालना मिळेल. प्रास्ताविक गटनिदेशक गेडकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक किशोर इरदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडोपंत बोढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक गराड ,घटे, धारणे, डुंबेरे, नाडमवार, कांबळे ,वरभे, नंदूरकर, चव्हाण, लांडगे आदींनी परिश्रम घेतले.