✒️सिंदेवाही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सिंदेवाही(दि.22डिसेंबर):-तालुक्यातील पेंढरी (कोकेवाडा) येथील माना आदिम जमात ग्राम शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मानकादेवी चौकात वकृत्व स्पर्धा, महिला मेळावा, प्रश्नमंजुषा , हळदीकुंकू आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच निशांत शिंदे होते.
विशेष अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, विद्यार्थी युवा संघटन प्रमुख धीरज दांडेकर, सरपंच ताराबाई राऊत,पोलीस पाटील ईश्वर सोनुले, तंटामुक्ती समितीचे सुधाकर चौधरी, पं. स.चे माजी सभापती अरविंद राऊत, ग्रा.पं. सदस्य दिवाकर चाचरकर , सचिन कराडे , मंदा चौखे, ममिता शेंडे, गीता भैसारे, रंजना आंबडारे, नगीना आत्राम, गुलाब चौधरी , अंकुश चौधरी, डॉ. संतोष चौधरी, गुरुदेव सेवा मंडळाचे भास्कर वाढई , सूर्यभान चौखे , विकास चौधरी, एकनाथ चौधरी , घनश्याम चौखे, वनिता चौधरी, देवांगना चौधरी, शामलता चौधरी आदींची उपस्थिती होती. नाग दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी माना आदिम जमात संस्कृती,थोर परंपरेची जपणूक होऊन नव्या पिढीला इतिहास माहीत होते आहे, हे कार्य अभिनंदनीय असल्याचे यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी प्रतिपादन केले. उपस्थित सर्व अतिथींनी समयोचित विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भक्तदास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप चौधरी यांनी केले.
दोन दिवस चाललेल्या या नागदिवाळीच्या निमित्ताने माना जमातीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य, नकला, नाटिका, दिंडी आदी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. आयोजनाचे हे सातवे वर्षे होते. रात्रौला कार्तिक शेंडे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला.