✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855
पुसद(दि.21डिसेंबर):-शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या मांडवा येथील शेतकऱ्यांच्या बकरीचा शेतात बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त मांडवा येथील सुमित रमेश राठोड हे शेतकरी १८ डिसेंबर ला बकरीला शेतातील धुर्यावर चारण्याकरिता सोडून दिले व ते शेतातील काम करीत होते. ते शेतातील कामात व्यस्त असताना बिबट्या या वन्य प्राण्याने अचानक चरत असलेल्या शेळीवर हल्ला केला.
त्यावेळी शेतात काम करणाऱ्या काही लोकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. आणि त्या दिशेने धाव घेऊन बिबट्याना बकरी खात असताना हाकलण्यात आले व बिबट्याच्या तावडीतून बकरीला सोडवणुक केली. त्यावेळी बकरी मृतावस्थेत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आली होती. वृत्त लिहीपर्यन्त शेंबाळपिंपरी वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. मांडवा परिसरात वारंवार बिबट्यांच्या दर्शनाने दहशतीचे वातावरण पसरले आहे.