✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.20डिसेंबर):-नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्र या ठिकाणी दोन दिवशीय मानवाधिकार रक्षकांची राष्ट्रीय परिषद ,ॲक्शन एड भारत या संस्थेने आयोजित केली होती .दिनांक 17 व 18 डिसेंबर रोजी ही परिषद देशाच्या राजधानीत आयोजित केली होती .त्यामध्ये सुमारे 22 राज्यातील निवडक प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीम. मनीषा भाटिया यांनी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तर सौरभ कुमार यांनी दोन दिवसात होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश व विषयपत्रिकेची मांडणी केली.
तर केंद्रीय डायरेक्टर दिपाली शर्मा यांनी उद्घाटनपर भाषण केले . दरम्यान देशभरातून आलेल्या सर्व मानवाधिकार रक्षक कार्यकर्त्यांनी आपली ओळख करण्याबरोबरच कामाचे आपापल्या स्वरूप व आढावा सांगितला. त्यानंतर श्रीमती हिरा (उत्तराखंड), जवान सिंग (राजस्थान) ,व मसूदभाई (तेलंगणा) यांनी जकार्ता (इंडोनेशिया) येथे पार पडलेल्या आशियाई पॅसिफिक परिषदेत झालेले विषय, चर्चा,ठराव व घोषणापत्र याचा धावता आढावा घेतला . तर डायरेक्टर तनवीर काजी यांनी युद्धग्रस्त गाजापट्टी व पॅलेस्टाईनशी एकजूट व समर्थनाची घोषणा केली.तेथील भयानक परिस्थिती सांगितली.मानवी हक्काचे उल्लंघन,भुखबळी, पायाभूत सेवांची आबाळ याचा आढावा घेतला व या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या इजराइलचा निषेध केला. यापुढे जगभरात फासीवादाबरोबरच जिओनिझमचा धोका वाढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच यानंतर उपस्थित मानव अधिकार रक्षक कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येकाने किमान पाच समविचारी सामाजिक कार्यकर्त्यांना गाजापट्टी व पॅलेस्टाईन समर्थनार्थ सहमती दर्शवण्यासाठी प्रवृत्त करावे विनंती केली. त्यानंतर सियोन कोंगरी व नयनजोती भुयान यांनी मागील झालेल्या चर्चेवर संक्षेपपणे दृष्टीक्षेप टाकला. राष्ट्रीय अभियानाच्या कृती आराखड्याची चौकट आखण्यात आली .भोजनानंतर मानवाधिकर रक्षकांच्या सुरक्षा व प्रोत्सानासाठी राज्यस्तरीय अभियान योजना विकसित करण्याबाबतच्या विषयावर विविध राज्यातील कार्यकर्त्यांनी गटचर्चा व त्याचे सादरीकरण केले. तर दिवसातील शेवटच्या सत्रामध्ये जलवायू परिवर्तन या विषयावर भविष्यातील नियोजन प्रचार अभियान व जमिनी स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनांचे एकत्रीकरण ,ठराव व कृती संशोधन या विषयावर देवव्रत पात्रा व मशकूर आलम यांनी सत्राचे सुलभकरण केले.
तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात एक्शन एड इंडियाचे राष्ट्रीय संचालक संदीपची चाचरा यांनी नेतृत्व उभारण्यासाठी दृष्टिकोन, प्राधान्यक्रम, रणनीती आखणे व सामूहिक नियोजनासाठी सामाजिक चळवळीची राष्ट्रीय अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली.त्याचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून समर्थन केले. नॅशनल डायरेक्ट तनवीर काजी यांनी राज्य व राष्ट्र स्तरावर विशिष्ट कार्यावर कृती संशोधनाचे नियोजन करणे याविषयावर मार्गदर्शन केले. तर मा.राघव यांनी मानव सामाजिक एकत्रीकरणासाठी व जनवकालतीसाठी साधन म्हणून कृती संशोधनाच्या वापराबद्दल कार्यकर्त्याची समज विकसित करण्याबाबत लक्ष वेधले.तर द्वितीय सत्र मध्ये खालीद चौधरी व पंकज कुमार यांनी कामगारांचे हक्क आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आत्तापर्यंतच्या योजनांची अध्यासन ,समर्थन व कृती नियोजन या विषयावर चर्चा केली तर शेवटी जागतिक मानव हक्क दिनानिमित्त समूह आधारित मानवी हक्क संरक्षणासाठी विशेष योगदान, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मानवी हक्क रक्षकांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह सत्कार करण्यात आला.
या या कार्यक्रमात राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे महासचिव मा.भरत लाल तसेच भारतीय पॉप्युलेशन फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका पुनम मुटरेजा, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर तर राज्यसभेच्या सदस्य खासदार माया नरोलीया( मध्य प्रदेश) या प्रमुख पाहुणे उपस्थित होते . ज्यावेळी 24 उत्कृष्ट मानवाधिकार रक्षकांचा सर्वोत्तम कामगिरीसाठी गौरव करण्यात आला शेवटी ॲक्शन एडचे राष्ट्रीय संचालक संदीपजी चाचरा यांनी आभार प्रदर्शन केले .यावेळी कार्यक्रमांमध्ये स्वागत शरद कुमार प्रास्ताविक ऍस्टर मारियासेल्वम तर सूत्रसंचालन दिपाली शर्मा यांनी केले .अशा प्रकारे दोन दिवसीय मानवाधिकार रक्षकांची बैठक उत्साही वातावरणात पार पडली.