✒️कर्जत(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कर्जत जि. अहिल्यानगर(दि.20डिसेंबर):-येथील दादा पाटील महाविद्यालय, कर्जत च्या वतीने दरवर्षी प्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अहिल्यानगर येथील ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांची निवड करण्यात आली आहे*. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या शिक्षका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी दरवर्षी स्री शिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाचे हे तिसरे वर्ष असून दिवसभर विविध साहित्यिक उपक्रमा बरोबरच काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शर्मिला गोसावी या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य संघटक असून त्यांची ‘बांगड्यांची खैरात’, नजराणा, मनमित अशी पुस्तके प्रकाशित आहेत. राज्यस्तरीय 15 शब्दगंध साहित्य संमेलनाच्या आयोजना मध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला असून आकाशवाणीवर अनेक वेळा काव्यवाचन झाले आहे. विविध साहित्यिक कार्यक्रमाच्या सूत्र संचालिका म्हणून त्या सर्व दूर परिचित आहेत. वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून शर्मिला गोसावी कार्यरत असून त्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्या कार्यात आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित स्री शिक्षिका साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उपाध्यक्षा प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, महारष्ट्र साहित्य परिषद, सावेडी शाखेचे कार्यवाह जयंत येलुलकर, चंद्रकांत पालवे, नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड, प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी अभिनंदन केले आहे.